शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नवापूर येथील महिलांनी बनवलेल्या वस्तू गेल्या थेट इटलीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 01:10 IST

पालघर तालुक्यातील तारापूर एमआयडीसी जवळील नवापूर गावातील महिलांनी बनवलेल्या वस्तू थेट इटलीला पोहोचल्या आहेत.

बोईसर : पालघर तालुक्यातील तारापूर एमआयडीसी जवळील नवापूर गावातील महिलांनी बनवलेल्या वस्तू थेट इटलीला पोहोचल्या आहेत. इटलीतील मिलान येथे नुकतेच एका प्रदर्शनाचे आयोजन केले होते, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.तारापूर औद्योगिक क्षेत्रातील औषध तयार करणाऱ्या लुपिन लिमिटेड या नामवंत कंपनीच्या लुपिन फाउंडेशन आणि ग्रामपंचायत नवापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्त्री सशक्तीकरणाच्या’ अनुषंगाने ‘शिलाई मशीन प्रशिक्षण’ नवापूर येथे सुरू केले होते. या प्रशिक्षणाला नवापूर येथील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपली गुणवत्ताही दाखवली. याची दखल घेत लुपिन फाउंडेशनने ‘स्त्री स्टाईल’च्या माध्यमातून जॉब वर्क आणून ‘स्त्री स्टाईल’ने ‘वेस्ट आऊट आॅफ बेस्ट’ या कल्पनेखाली लॅपटॉप बॅगा, गॉगल पाऊच, बो, टाय, बॅग, किचन अ‍ॅप्रन अशी विविध कामे दिली.>३८ महिलांनी केला अ‍ॅडव्हान्स कोर्सनवापूर ग्रामपंचायत, लुपिन फाउंडेशन आणि स्त्री स्टाईल यांनी दाखवलेला विश्वास सार्थकी लावत महिलांनी ही संधी अथक परिश्रम करून ठरवलेल्या दिवसात पूर्ण केले. इटलीतील प्रदर्शनात याच वस्तू ठेवण्यात आल्या होत्या.आतापर्यंत गावातील ९९ महिलांनी बेसिक कोर्स केला असून ३८ महिलांनी अ‍ॅडव्हान्स कोर्स केला आहे. नवापूर ग्रामपंचायतीचे सरपंच उदय मेहेर आणि उपसरपंच हेमंत बारी यांनी लुपिन फाउंडेशन आणि महिलांशी संवाद साधून प्रोजेक्ट यशस्वी केला.