शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नियम मोडण्यात महिला आघाडीवर

By admin | Updated: February 10, 2017 03:55 IST

लायसन्स,परमिटसह अन्य कागदपत्रे जवळ नसणे, अवैध वाहतूक करणे बेकायदेशीररित्या गाड्या चालविणे आदी गुन्हे करणाऱ्या सुमारे १ हजार

पालघर : लायसन्स,परमिटसह अन्य कागदपत्रे जवळ नसणे, अवैध वाहतूक करणे बेकायदेशीररित्या गाड्या चालविणे आदी गुन्हे करणाऱ्या सुमारे १ हजार चालकांकडून पालघर पोलिसांनी लाखो रु पयांचा दंड वसूल केला असून विशेष म्हणजे हे गुन्हे करणाऱ्यात ७० टक्के महिलांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर हाती आली.पालघर शहरात पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी चार रस्ता, जगदंबा हॉटेल, माहीम वळण रस्ता, टेम्भोडे पेट्रोल पंप, हुतात्मा स्तंभ इ. ठिकाणी मोटारसायकल स्वार, रिक्षा चालक, सहाआसनी रिक्षा चालक, जडवाहतूक करणारे ट्रक इत्यादींची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. यावेळी वाहनचालकांकडे लायसन्स-गाडीची कागदपत्रे नसणे, ट्रिपल सीट, बॅज नसणे, परिमट नसणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविणे अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालका विरोधात मोठी कारवाई केली. मोहीम सुरू करण्यात आल्यानंतर अनेकांनी आपले मित्र, नातेवाईकांना व्हॉट्सअपद्वारे पूर्व सूचना दिल्याने अनेकांना आपल्यावरील कारवाई टाळता आली. मात्र आपल्या स्कुटी वरून शहरात फिरणाऱ्या अनेक मुली, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला यांच्याकडे लायसन नसल्याचे पोलिसांना आढळून आले. दंड करण्यात आलेल्या मध्ये महिलांचा मोठा सहभाग असल्याचे आढळून आले अनेक राजकीय, प्रतिष्ठित व्यक्ती या कारवाई पासून आपल्या नातेवाईकांची सुटका व्हावी यासाठी पोलिसां कडे आपले वजन खर्ची घालण्याचा प्रयत्न करीत होते. आता लवकरच हेल्मेट सक्तीची मोहीमही उघडणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)