शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

महिलेचा गळा चिरून खून

By admin | Updated: July 5, 2016 02:35 IST

वसई पूर्वेतील फादरवाडी येथे असलेल्या विद्या विकासिनी शाळेच्या पाठीमागील मैदानात वालीव पोलीसांना वीस ते पंचवीस वर्षे वयाच्या अज्ञात महिलेचा कुजलेला व विवस्त्र अवस्थेतील

वसई : वसई पूर्वेतील फादरवाडी येथे असलेल्या विद्या विकासिनी शाळेच्या पाठीमागील मैदानात वालीव पोलीसांना वीस ते पंचवीस वर्षे वयाच्या अज्ञात महिलेचा कुजलेला व विवस्त्र अवस्थेतील मृतदेह सापडला. तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.वसई पूर्व फादरवाडी येथे विद्या विकासिनी शाळा आहे. काल शाळेच्या पाठीमागील मैदानात एका महिलेचा विवस्त्र व कुजलेल्या अवस्थेत मृतदेह पडला असल्याची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर निरिक्षक महेश पाटील आपल्या पथकासह घटनास्थळी पोहचले. त्यानंतर पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. विद्या विकासिनी शाळेच्या पाठी मागील बाजूस मोठे मैदान असून मैदानाच्या भिंती पलिकडे मोठी लोकवस्ती आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने विद्यार्थीही मैदानात जात नाहीत. त्यामुळे हा मृतदेह बऱ्याच दिवसापासून पडला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत महिलेची ओळख पटवण्याचे काम वालीव पोलीसांकडून सुरु आहे.दरम्यान, या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी चार पथके तार करण्यात आली आहे. पोलिसांनी शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून माग काढण्यास सुरुवात केली आहे. या महिलेला या ठिकाणी कोठून तरी आणून मारले असावे व किमान तीन-चार जण त्यावेळी हजर असावेत असा पोलिसांचा संशय आहे. ज्या क्रूरपणे तिची हत्या झाली ते पहाता तिच्याबद्दल खून्यांच्या मनात तीव्र द्वेष संताप असावा असे जाणवते असे पोलिसांनी म्हटले आहे.