शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

महिलादिनीच नवविवाहितेची हत्या

By admin | Updated: March 10, 2017 02:52 IST

जागतिक महिला दिनी विरारमधील एका नवविवाहीतेची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. सासरच्यांनी नवविवाहितेचा गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन मृत्यु

वसई : जागतिक महिला दिनी विरारमधील एका नवविवाहीतेची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. सासरच्यांनी नवविवाहितेचा गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन मृत्यु झाल्याचा बनाव रचला होता. मात्र, पोलिसांनी तिची हत्या केल्याच्या आरोपाखाली पतीला अटक केली आहे. अपर्णा उर्फ संपदा सांबरे (२५) असे तिचे नाव आहे. अपर्णाचे ११ फेब्रुवारीला सागर सांबरे (२८) याच्याशी लग्न झाले होते. दोघे विरार पश्चिमेकडील शुभ लाभ इमारतीत रहात होते. एकीकडे जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांचा गौरव केला जात असताना अपर्णासाठी मात्र तो दिवस अखेरचा ठरला. काही दिवसांपूर्वीच लग्न झालेली अपर्णा सुखी संसाराची स्वप्ने रंगवत होती. मात्र, संध्याकाळी घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन अपर्णाचा मृत्यु झाला होता.अपर्णाचे सुनील मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी गॅसचा पाईप निघालेला होता. तर अपर्णाचा मोबाईल तिच्या जळालेल्या मृतदेहाशेजारी पडलेला होता. प्रारंभी अपर्णाने आत्महत्या केल्याचे मोरे यांना सांगण्यात आले होते. पण, आपल्या मुलीची हत्या करण्यात आल्याचा आरोप करीत मोरे यांनी तशी तक्रार विरार पोलीस ठाण्यात दिली. अपर्णा सोशल मिडीयावर सतत आपल्या मित्रांशी बोलत असे. त्यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असत. याप्रकारामुळे सागर तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता. गॅस सिलेंडरचा स्फोट झाला त्यादिवशी सागर अर्धा दिवसानंतर सुट्टी घेऊन घरी आला होता. त्यामुळे अपर्णाच्या घरच्यांनी सागरवर संशय घेतला आहे. प्रत्यक्षात गॅस सिलेंडरचा स्फोट झालाच नव्हता. पण, तिने जाळून घेऊन आत्महत्या केल्याचे तिच्या सासरच्यांनी सांगितले. मात्र, अपर्णाला जाळून ठार मारण्यात आल्याची तिच्या वडिलांची तक्रार आहे. त्यावरून विरार पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करून सागरला अटक केली आहे. (प्रतिनिधी)