शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

व्याजाचे पैसे देऊनही महिलेला शिवीगाळ करत केली मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 00:58 IST

पालघर येथील लेखा विभागात लेखा परीक्षक म्हणून काम करणाऱ्या ५९ वर्षीय महिलेने २ लाख कर्ज घेतले होते.

नालासोपारा : पालघर येथील लेखा विभागात लेखा परीक्षक म्हणून काम करणाऱ्या ५९ वर्षीय महिलेने २ लाख कर्ज घेतले होते. पण त्याबदल्यात तब्बल ३० लाख रूपये व्याज देऊनही मुद्दल दिली नाही म्हणून शिवीगाळ करून धक्काबुक्की करणाºया सावकारी आरोपी महिलेविरोधात माणिकपूर पोलिसांनी गुरूवारी गुन्हा दाखल केला. आरोपी महिलेचा व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय असून कोणी अजून पीडित असतील तर त्यांनी माणिकपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.वसई पश्चिमेकडील स्टेला या परिसरातील कर्मा अपार्टमेंटच्या सदनिका नंबर सी/४०४ मध्ये राहणाºया आणि पालघर येथील लेखा विभागात लेखा परीक्षक म्हणून नोकरी करणाºया सीता पंकजाक्षण (५९) यांचा मुलगा प्रफुल्ल याचा फेब्रुवारी २०१६ रोजी साखरपुडा ठरल्याने दोन लाखांची गरज होती. त्यावेळी सोसायटीमधील लोकांकडून कळले की, आपल्याच सोसायटीमधील हेमलता सैनी या व्याजाने पैसे देते. त्यामुळे तिला जाऊन भेटल्यावर तुम्ही व्याजाने पैसे देता का ? तुमच्याकडे सावकारी अधिनियमनव्ये व्याजाने पैसे देण्याचा कोणता परवाना आहे का ? त्यावर हेमलता यांनी सीता यांना असा कोणताही परवाना नसून आजपर्यंत अनेकांना व्याजाने पैसे दिल्याचे सांगितले.तुम्हाला हवे आहे का ? असे विचारल्यावर मला पैशाची गरज असून तिच्याकडून सीता यांनी १५ टक्के व्याजाने दोन लाख रु पये घेतले. व्याज म्हणून दर महिन्याला ३० हजार रु पये देण्याचे ठरले होते. आजपर्यंत सीता यांनी हेमलता यांच्या खात्यावर आॅनलाईन कॅनरा बँक, जनसेवा बँक यामध्ये १६ लाख ७६ हजार ५० रु पये आणि रोखीने १३ लाख २३ हजार ९५० रु पये असे एकूण ३० लाख रूपयांचे व्याज दिले आहे. तरीसुद्धा पैसे बाकी असल्याचे सांगण्यात आले व १६ तारखेला रात्री १० वाजण्याच्या सुमारास हेमलता घरी येऊन व्याजाचे पैसे मागू लागली व तिच्या हातातील मोबाइल जबरदस्तीने खेचून घेत पैसे दिल्यावर मोबाइल परत देईन असे सांगून निघून गेली.दुसºया दिवशी म्हणजेच १७ तारखेला रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास सीता यांच्या घरी परत येऊन सीता यांच्या पतीला सांगितले की, तुमच्या पत्नीने व्याजाने पैसे घेतले असून मला लवकरात लवकर पैसे पाहिजे असे सांगत शिवीगाळ करून दमदाटी करत धक्काबुक्की केली.>पोलीसही आश्चर्यचकितशेवटी कंटाळून पुराव्यासह माणिकपूर पोलीस ठाण्यात जाऊन सीता यांनी पोलिसांना२ लाखांसाठी ३० लाख रूपये व्याज दिल्याचे सांगितल्यावर आश्चर्यचकित झाले आहे. पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.