शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विवेक पंडित आज सुटणार?

By admin | Updated: May 3, 2017 05:11 IST

मुख्यमंत्री आणि श्रमजीवीच्या अध्यक्षा विद्युलता पंडित ह्यांच्या मध्ये झालेल्या यशस्वी चर्चे नंतर आज श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक

पालघर : मुख्यमंत्री आणि श्रमजीवीच्या अध्यक्षा विद्युलता पंडित ह्यांच्या मध्ये झालेल्या यशस्वी चर्चे नंतर आज श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित व कार्यकर्त्यांची पालघर न्यायालयात जामीन घेण्याची प्रक्रि या पूर्ण झाल्याने उद्या त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.श्रमजीवी संघटनेचे नेते विवेक पंडित व त्यांच्या ३७ कार्यकर्त्यांना सरकारी कामकाजात अडथळा व अन्य आरोपाखाली जिल्हापरिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी निधी चौधरी ह्यांच्या तक्र ारी नंतर अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी जामीन घेण्यास नकार दिल्याने न्यायालयाने त्यांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. त्यांच्या अटकेचे पडसाद पूर्ण जिल्ह्यात उमटले होते.तर जिल्हापरिषद व पंचायत समिती मधील अधिकारी,कर्मचारी आणि त्यांच्या संघटनांनी काम बंद आंदोलन केले होते. या वादात सर्वसामान्यांची कामे रखडली जात जिल्ह्याच्या विकास कामांना मात्र खीळ बसली होती. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्रमजीवींच्या अध्यक्षा विद्युलता पंडित व अन्य कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्रांची भेट घेऊन या प्रकरणी दाद मागितली होती. मुख्यमंत्र्यांच्या या भेटी दरम्यान विवेक पंडित व सहकाऱ्यांनी प्रथम जामीन देऊन बाहेर यावे त्यानंतर या प्रकरणी त्यांच्याशी सविस्तर चर्चा व चौकशी करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यानी या शिष्टमंडळास दिले होते त्यानुसार पंडित व त्यांच्या सहकार्यांनी जामीन घेण्याचा निर्णय घेतला. (वार्ताहर)