शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

संशयातून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

By admin | Updated: September 12, 2016 03:02 IST

विक्रमगड तालुक्यातील धामणी या गावातील भिमी बरफा हिची तिचा पती चिंतामणी याने कुऱ्हाडीने हत्या केली.

विरार :विक्रमगड तालुक्यातील धामणी या गावातील भिमी बरफा हिची तिचा पती चिंतामणी याने कुऱ्हाडीने हत्या केली. तसेच विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुलींवर बलात्कार आणि सासऱ्याने सुनेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. चिंंतामण हा चारित्र्याच्या संशयावरून व पैशासाठी भिमीसोबत नेहमी वाद घालीत होता. ६ सप्टेंबरला रागाच्या भरात तिच्या मानेवर कुऱ्हाडीचे घाव घालून त्याने तिची हत्या केली.वसई येथे राहणाऱ्या पंकज पांडे या तरुणाने नायगाव मधील एका सतरा वर्षीय मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर बळजबरीने १२ एप्रिल २०१६ पासून श्रीनिवास लॉज मध्ये नेऊन बलात्कार केला होता. पंकज पांडे आणि पीडित मुलगी उत्तर प्रदेश मधील एकाच गावात राहणारे आहेत. आपल्या मुलीची फसवणूक करून तिच्यावर बलात्कार केल्याची तिच्या आईने तक्रार दिली. मुलगी अज्ञान असल्याने लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर दुसरीकडे विरार मधील मनवेलपाडा येथे राहणाऱ्या विरेंद्र मिश्रा या सासऱ्यानेच आपण झोपलो असता आपला विनयभंग केल्याची तक्रार सुनेने विरार पोलीस ठाण्यात केली असून मिश्राला अटक करण्यात आली आहे. तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नालासोपारा पूर्व येथून एक १३ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार तुळींज पोलीस ठाण्यात केली आहे. (वार्ताहर)