शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
3
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
4
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
5
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
6
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
7
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
8
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
9
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
10
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
11
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
12
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
13
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
14
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
15
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
16
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
17
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
18
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
19
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
20
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार

‘कुपोषण रोखण्यासाठी व्यापक उपाययोजना’

By admin | Updated: May 2, 2017 01:58 IST

महाराष्ट्र दिनाच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस परेड मैदान, कोळगाव येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले

पालघर : महाराष्ट्र दिनाच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस परेड मैदान, कोळगाव येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विष्णू सवरा यांनी पालघर जिल्ह्यात विविध विकासाची कामे सुरु झाली असून रस्ते वाहतूक, आरोग्य, वीज,पाणी, कृषीविषयक प्रश्न आदींसाठी शासनाकडून वेळोवेळी महत्वपूर्ण निर्णय घेऊन भरीव तरतूद करण्यात येत असल्याचे सांगितले. पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबध्द असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. पुढे पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याचे सांगत जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागात कुपोषण व बालमृत्यू कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याला शासनाने प्राधान्य दिलेले असून त्यासाठी व्यापक नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. स्वयंरोजगाराच्या संधी मिळण्यासाठी जिल्ह्यात स्वयम प्रकल्प राबविण्यात येणार असून प्रमोद महाजन कौशल्य विकास अंतर्गत जिल्ह्यात तरु णांचे रोजगार मेळावे आयोजित केले, विविध कंपन्यांशी सामंजस्य करार करून त्याअंतर्गत त्यांना प्रशिक्षण रोजगाराच्या संधी प्राप्त करून दिल्या. त्याच्या बरोबरीने ‘कियोस्क’च्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागाच्या सेवा एकाच छताखाली आणून नागरिकांची सोय करणारा राज्यातील पहिलाच जिल्हा ठरला असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.स्वच्छ भारत अभियानात जिल्ह्याने चांगली कामिगरी केली असून तलासरी, वसई, वाडा, जव्हार, मोखाडा, विक्र मगड हे तालुके हागणदारीमुक्त झाले आहेत. लवकरच पालघर जिल्हा निर्मल जिल्हा म्हणून घोषित करण्यात येईल. असेही त्यांनी सांगितले. ध्वजारोहणानंतर पोलीस पथक, महिला पोलीस पथक, पोलीस बँडपथक, पालघर अग्निशामक पथक आदींंनी पालकमंत्र्याना मानवंदना दिली. याप्रंसगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुरेखा थेतले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक, मंजुनाथ सिंगे, प्रभारी जिल्हाधिकारी सतिश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे, विविध विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचारी,ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. पोलीस दलात उत्कृष्ट कामिगरी केलेल्या पोलीस निरीक्षक संजय हजारे, प्रकाश बिराजदार, पोलीस उपनिरीक्षक शीतलकुमार डोईजड, प्रकाश गोसावी, स.फौ. शंकर पाटील, मनोहर भालेराव, महंमद शेख तर पोलीस हवालदार सुभाष कासेकर व सुभाष गोईलकर यांना पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते सन्मान पदक व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. तसेच यावेळी विक्र मगडचे योगेश कनोजा, तलाठी सजा बोरांडा, विक्र मगड यांचा आदर्श तलाठी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत निवड झालेल्या वसई तालुक्यातील अर्नाळा, पालघर तालुक्यातील मनोर, डहाणू ङ्क्त वाणगाव, तलासरी-वेवजी, वाडा-गो-हे, विक्र मगड, कुर्झे, जव्हार ङ्क्त वावर-वांगणी, मोखाडा ङ्क्त खोडाळा या ग्रामपंचायतीचा पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशिस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. (प्रतिनिधी)तलासरीत महाराष्ट्र दिन उत्सहात साजरा तलासरी : महाराष्ट्र राज्य स्थापने चा ५७ वा वर्धापन दिन तलासरीत उत्सहात साजरा करण्यात आला. या निमित्त तलासरी तहसील कार्यालयात आमदार पास्कल धनारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी खासदार चिंतामण वनगा, सभापती वनशा दुमाडा, उपसभापती भानुदास भोये, तहसीलदार विशाल दौडकर, नायब तहसीलदार, महसूल कर्मचारी, जिल्हा परिषद सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तलासरी नगर पंचायतीचा ध्वजारोहनाचा कायक्रम जुन्या ग्रामपंचायत कार्यालया जवळ नगराध्यक्षा स्मिता वळवी यांच्या हस्ते ध्वजा रोहन करण्यात आले. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी सागर साळुंखे, उपनगराध्यक्ष सुरेश भोये, नगरसेवक व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंचायत समिती येथे सभापती वनशा दुमाडा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्र मास गटविकास अधिकारी राहुल धूम, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, कर्मचारी उपस्थित होते.मनसेच्या वतीने महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहातपालघर : महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पालघर यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करून महाराष्ट्र दिन साजरा केला. पालघर विधानसभा उपजिल्हाअध्यक्ष आशिष मेस्त्री यांच्या हस्ते पालघर शहरातील हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र वाहून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या १०६ शूर हुतात्मांना मशाल प्रज्वलीत करून मानवंदना देण्यात आली.त्यानंतर शांतीनगर येथे सकाळी ९ ते दुपारी २ वाजे पर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिर व औषध वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे लाभ पालघर शहरातील नागरीकांनी मोठयÞा संख्येने घेतला. या आरोग्य शिबिरासाठी डॉ अभिजीत देशपांडे, डॉ राजू दास, डॉ मोहम्मद हसन यांनी रु ग्णांची तपासणी करून उपचार केले. कार्यक्र मात प्रमुख पाहुणे म्हणून मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विजय वाढीया व गोविंद पाटील, उपशहराध्यक्ष अमित उलकंदे, विजय काचरे, विभाग अध्यक्ष रंजीत चव्हाण, सुभाष राठोड, मिथुन चौधरी अमोल सावंत, रोजगार स्वयरोजगार विभागाचे तालुका सचिव ज्योतिष इजराईल, विभाग अध्यक्ष अखिलेश वर्मा, शाखा अध्यक्ष संजय चव्हाण, कैलाश मोर्या, राम चव्हाण, गजानन खडके, अजय राठोड, दिलीप शेरे, प्रणव कोळी , अनिकेत होडारकर यांनी मोलाचे सहकार्य करून महाराष्ट्र दिन मोठ्यÞा उत्साहात साजरा केला.बोईसरला १०६ हुतात्म्यांना मानवंदनाबोईसर : संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मिती करीता कामी आलेल्या १०६ हुतात्म्यांना महाराष्ट्र दिनी बोईसर येथे सोमवारी मानवंदना देण्यात आली. तर तारापुर औद्योगिक क्षेत्रासह जिल्ह्यातील कामगारांना कामगार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. बोईसर रेल्वे स्थानकाच्या आवारात आयोजित केलेल्या कार्यक्रमास बोईसर पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जोगदंड पोलीस उपनिरीक्षक संदीप पोमन, महाराष्ट्र नविनर्माण सेना पालघर तालुका अध्यक्ष समीर मोरे, उपतालुका अध्यक्ष शिवाजी रेम्बाळकर उपस्थित होते.भाजपा युवा मोर्चाकडून स्वच्छता मोहीम...विक्रमगड : १ मे अर्थात महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्ताने भाजपा जिल्हा युवा मार्चाच्यावतीने पालघर जिल्हयातील विक्रमगड, मोखाडा, वाडा, तलासरी, कासा व पालघर या ठिकाणी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जिल्यातील शासकीय रुग्णालये, जिल्हा ग्रामीण रुग्णालय, जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांत जाऊन स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कामगार दिन हा खरतर सेवेचा सन्मान करण्याचा दिवस असल्याने या कार्यालयातील सफाई कर्मचाऱ्यांना कामगार दिनाच्या शुभेच्छा म्हणून फुले देऊन त्याचा सन्मान करण्यात आला. भाजपा तर्फे राबविलेल्या या मोहिमेची माहिती पालघर जिल्हायुवामार्चा अध्यक्ष सुशिल औसरकर यांनी लोकमतला दिली़ पक्षातर्फे राबविलेल्या कामगाराभिमुख कामाची माहिती यावेळी देण्यात आली.या मोहिमेमध्ये आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा, खासदार चिंतामण वनगा, आमदार पास्कल धनारे, यांनी यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना व पदाधिकारी कार्यकर्त्याना मार्गदर्शन केले़ तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेंद्र निकुंभ, समीर पाटील, रोहन चौधरी, अंकुष राउत, शुुभम डिगोंरे, नकुल पटेकर कुणाल सातवी, अक्षय आळशी, निशिकांत संखे, श्रीनिवास वनगा उपस्थित होते.