शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉटसअ‍ॅप ग्रुपचे ५५ हजार ५५५

By admin | Updated: November 16, 2016 04:09 IST

विना अनुदानीत शाळांमधील शिक्षकांच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी औरंगाबाद येथे आंदोलन करीत असतांना मृत झालेल्या जाफराबाद

शुभदा सासवडे / सफाळेविना अनुदानीत शाळांमधील शिक्षकांच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी औरंगाबाद येथे आंदोलन करीत असतांना मृत झालेल्या जाफराबाद येथील गजानन खरात यांच्या निराधार कुटुंबास येथील गुरुकुल व्हॉटसअ‍ॅप ग्रुपने ५५ हजार ५५५ रुपयांचा निधी दिला आहे व सोशल मीडियाचादेखील किती विधायक वापर करता येऊ शकतो याचा आदर्शही घालून दिला आहे.मराठवाडयातील जालना जिल्ह्यÞातील जाफराबाद येथील समर्थ विद्यालयात विना अनुदानित शाळेत कार्यरत असलेल्या गजानन विठोबा खरात या शिक्षकाचा विना अनुदानित शाळांना अनुदान मिळावे या करिता औरंगाबाद येथे आंदोलन करित असतांना शुक्र वार दि.१० जून २०१६ रोजी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात त्यांची आई चंद्रकला, पत्नी सुकेशनी व मुलगा यश असा परिवार असून त्यांच्या पश्चात कमावणारी एकही व्यक्ती नसल्याने व त्यांची शेती ही नसल्याने या कुटुंबावर मोठे संकट कोसळले. ही घटना संपूर्ण राज्यभर वाऱ्यासारखी पसरली. ते विना अनुदानित शाळेत नाममात्र मानधनावर काम करत असल्याने कुटूंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होते. म्हणून ते शाळेच्या नोकरी व्यतिरिक्त अन्यत्र मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरिनर्वाह करीत होते. तसेच गावापासून शाळे पर्यंत सुमारे सहा किलोमीटर ते रोज पायी ये जा करीत होते. ही हकिगत प्रमोद पाटील अ‍ॅडमिन असलेल्या ‘गुरु कुल’ वहॉटस अ‍ॅप ग्रुप वर पोस्ट करण्यात आली. तदनंतर गुरु कुल सहाय्य निधी समिती स्थापन करून तिच्या माध्यमातून सहाय्य निधी जमा करण्यात आला. यात शिक्षकांनी पाचशे पासून दोन ते अडीच हजार रुपया पर्यंतची रक्कम जमा केली. ही रक्कम ५५ हजार ५५५ रुपये रक्कम खरात यांच्या जालना जिल्ह्यÞातील जाफराबाद (वरखेडा) या त्यांच्या मुळगावी जाऊन त्यांच्या पत्नी व आई यांच्या हाती गुरूवारी डॅरेल डिमेलो, प्रमोद पाटील, विलास पाटील,संजय पाटील, राम पाटील, सुधाकर ठाकूर आदींनी सुपूर्द केली. या वेळी गावचे पोलीस पाटील विठ्ठल डवणे, सामाजिक कार्यकर्ते गजानन उबाळे, मधुकर खरात, प्रकाश राऊत आदी उपस्थित होते.या बहुमूल्य मदतीबद्दल खरात यांच्या पत्नी व आई यांनी सर्व शिक्षकांचे आभार व्यक्त केले .यापुढेही जर एखाद्या शिक्षकाच्या बाबतीत अशी दुर्दैवी घटना घडली अन कुटुंबापुढे आर्थीक संकट उभे राहिले तर त्यालाही अशाच सहृदय मदतीचा हात देण्याचा मनोदय या ग्रृपमधील शिक्षकांनी व्यक्त केला आहे. त्यांचे कौतुक होत आहे.