शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

ज्याच्या नाही ललाटी, तो करी तलाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 06:09 IST

सफाळे जवळील माकूणसार गावातील सर्वे नंबर १८० या साडेसात एकर जमिनीवर दुसºयाच व्यक्तीच्या नावे पीकपाणी नोंद केली असल्याचा प्रताप पालघर तहसील कार्यालयातील एका अव्वल कारकुनाच्या मदतीने तत्कालीन तलाठी रत्नदीप दळवी ह्याने केला असून जिल्हाधिका-यानी तात्काळ या प्रकरणातील दोन्ही दोषींवर कडक कारवाईची मागणी माकूणसार ग्रामस्थांनी केली आहे.

- हितेन नाईकपालघर -  सफाळे जवळील माकूणसार गावातील सर्वे नंबर १८० या साडेसात एकर जमिनीवर दुसºयाच व्यक्तीच्या नावे पीकपाणी नोंद केली असल्याचा प्रताप पालघर तहसील कार्यालयातील एका अव्वल कारकुनाच्या मदतीने तत्कालीन तलाठी रत्नदीप दळवी ह्याने केला असून जिल्हाधिका-यानी तात्काळ या प्रकरणातील दोन्ही दोषींवर कडक कारवाईची मागणी माकूणसार ग्रामस्थांनी केली आहे.काही दिवसांपूर्वी एका ति-हाइत व्यक्ती मार्फत या जागेवर अचानक तारेचे कुंपण घालून तो बळकावण्याचा प्रयत्न केला गेला. ग्रामस्थांच्या विरोधाला न जुमानता त्याने कुंपण घातले व हा भूखंड बळकावण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्या लगत असलेल्या माकूणसार खाडीचे खारे पाणी शिरून ही जमीन नापीक व पडीक होती. मात्र, अचानक ती लागवडी खाली असल्याचा देखावा करून तेथे शेती करत असल्याचा बनाव जमीन लाटण्याचा प्रयत्न करणाºया व्यक्तिमार्फत रचण्यात आला आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला असून ही जमीन पूर्वी पडीक होती आणि अचानक ती पिकपाण्याखाली आली कशी? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकूनानी या पीकपाणीच्या नोंदी स्वत:च्या आर्थिक स्वार्थासाठी केल्या असून त्यावेळचे तलाठी रत्नदीप दळवी यांनी तशा नोंदी व फेरफार केल्या असल्याने यात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.हा भूखंड हा खाडी पात्राच्या जवळ असल्यामुळे येथील खारे पाणी या भूखंडावर पसरत असल्यामुळे नजीकच्या शेतकºयांच्या जमिनीचे त्यापासून रक्षण होते. परंतु आता या भूखंडावर मोठे बांध बांधण्यात आल्याने खाडीचे खारे पाणी थेट शेतीमध्ये जाऊन जमिनी नापीक होण्याचा धोका वाढला आहे. तसेच सदर इसमाने माकूणसार पूर्वेकडून पश्चिमेकडे खाडीपात्रात जाणाºया नैसिर्गक नाल्याच्या मार्गात मोठा बांध घालून या नैसिर्गक नाल्याचा मार्ग पूर्णत: बंद केला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी माकुणसार पालघर मुख्य रस्त्यावर साचून माकूणसार आणि लगतच्या २० गावांचा संपर्कतुटण्याची भीती व्यक्त होत आहे.या भूखंडावरील सर्व बेकायदेशीर कामाविरोधात माकूणसार ग्रामस्थानी या विरोधात ग्रामपंचायत सभेत ठरावही घेण्यात आला आहे. याप्रकरणी प्रांत अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून संबंधित भूखंडावरील सर्व अतिक्र मण दूर करण्याची आणि सर्व दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यावर महसूल विभाग आणि प्रशासन यावर काय कारवाई करेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.येथील नैसिर्गक नाला बंद केल्याने शेतकºयांचे फार मोठे नुकसान होणार आहे. या इसमाविरोधात व या बेकायदेशीर कामाविरोधात ग्रामस्थांनी मिळून ग्रामसभेत याविरोधी ठराव घेतलेला आहे.- जयंत पाटील, सरपंचसंजय दुबे नामक व्यक्तींनी पीकपाणी नोंद केली असल्याचे प्राथमिक स्तरावरून आढळून येत असून ह्या प्रकरणाचा अहवाल तहसीलदारांकडे सादर करणार आहे.- गौरंग बंगारा, मंडळ अधिकारी,

टॅग्स :Vasai Virarवसई विरार