शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

सिग्नल यंत्रणांचा वाली कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 23:29 IST

पालिका व वाहतूक पोलीस अधिकारी हे एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. तसेच ठेकेदारांवर देखील कारवाई होत नसल्याने ते ही मोकाट आहेत. यातून जनतेच्या पैैशाची नासाडी मात्र वर्षानुवर्षे सुरू आहे.

विरार : वसई विरार शहरात नवीन सिग्नल बसवण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. मात्र, एका बाजूला पालिकेतर्फे सिग्नल बांधणाऱ्या ठेकेदारांवर अद्यापही कारवाई करण्यात येत नाही. तर दुसरीकडे वाहतूक विभाग पोलीस याकडे दुर्लक्ष करीत आहेत. खराब सिग्नल यंत्रणांच्या दुरुस्तीबाबत पालिका व वाहतूक पोलीस अधिकारी हे जबाबदारी घेत नसल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होत आहे.वसईमध्ये नवीन सिग्नल बसविण्यासाठी पालिका प्रयत्न करत आहे. तर यासाठी पालिकेने काम देखील सुरु केले आहे. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून आधीपासून असलेल्या सिग्नल यंत्रणांमध्ये बिघाड होत असतांना अजूनही त्यात सुधारणा करण्यात आलेली नाही.

महापालिका व वाहतूक पोलीस अधिकारी हे चौकशी करण्यात दिवस वाया घालवत असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्याच प्रमाणे सिग्नल बांधण्याचे काम महापालिकेचे होते तर यासाठी पालिकेतर्फे ठेकेदार नेमण्यात आले होते. तर ठेकेदारांच्या निकृष्ट कामामुळे सिग्नल यंत्रणांमध्ये सतत बिघाड होत आहे. तरी देखील ठेकेदरांवर अद्यापही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच सिग्नल यंत्रणा महापालिकेने बांधली असली तरी याची देखरेख वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांकडून होत असते, परंतु महापालिका व वाहतूक पोलीस अधिकारी हे एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. यामुळे यंत्रणे दुरु स्त होण्यास विलंब होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

वसई तालुक्यात लावण्यात आलेले सिग्नल मधेच बंद पडते आहे. तर यामुळे वाहन चालक गडबडून थांबतात व यामुळे वाहतूक कोंडी व अपघात होण्याची शक्यता वाढत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून विरारमधील जकात नाक्यावरील सिग्नल बंद पडत होता. मात्र आता नालासोपारा, आर.जे. नगर, मनवेल पाडा याठिकाणी देखील सिग्नल बंद पडत असून त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. वाहतूक पोलीस अधिकाºयांनी सिग्नल यंत्रणात बिघाड होत असल्याने त्याची तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, अद्यापही त्याची तपासणी देखील न झाल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

सिग्नल यंत्रणा महापालिकेच्या हातात आहेत. त्याच्या दुरुस्तीचे काम ती बघते. तरी आम्ही लवकरच त्याची दुरुस्ती करू.’’ - संपत पाटील, वाहतूक विभाग पोलीस अधिकारी,

सिग्नल महापालिकेतर्फे बांधण्यात आले तरी त्याची देखरेख वाहतूक विभागाने करणे गरजेचे आहे. याची माहिती घेऊन लगेच काम सुरु करू.’’ - बी.जी.पवार, आयुक्त