शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील झाडे कापण्याची जबाबदारी कुणाची?

By admin | Updated: July 30, 2015 22:32 IST

पालघर जिल्ह्यातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या बेसुमार झाडांची कित्येक वर्षांपासून छाटणीच झाली नसल्याने त्यांची अमर्याद वाढ होऊन मोठमोठ्या झाडांच्या फांद्या

डहाणू : पालघर जिल्ह्यातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या बेसुमार झाडांची कित्येक वर्षांपासून छाटणीच झाली नसल्याने त्यांची अमर्याद वाढ होऊन मोठमोठ्या झाडांच्या फांद्या मुख्य रस्त्यावर येत आहेत. वादळ तसेच सोसाट्याच्या वाऱ्याने या फांद्या तुटून नागरिकांचा बळी जातो. अशा दुर्घटना वारंवार होऊनही झाडे छाटण्याची जबाबदारी कोणीच घेत नसल्याने नागरिकांना तसेच वाहनचालकांना पावसाळ्यात बाहेर पडणे भीतिदायक वाटते आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत, नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा यासाठी जिल्ह्यात विशेष शासकीय यंत्रणा उभी करण्याची मागणी ग्रामस्थ तसेच वाहनचालकांकडून होत आहे.पालघर जिल्ह्यातील डहाणू, पालघर, बोईसर, तलासरी, जव्हार, सूर्यानगर, चारोटी, कासा, वानगाव, धा. डहाणू या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या मुख्य रस्त्याच्या कडेला हजारो झाडे १०० वर्षांपूर्वीपासूनची आहेत. पावसाळ्यात सोसाट्याचा वारा सुटल्यास याचा धोका वाढतो. जून, जुलै महिन्यांत झालेल्या मुसळधार पावसात हजारो झाडे तुटून तसेच जमिनीतून उन्मळून मुख्य रस्त्यावर पडल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. शिवाय, डहाणू, मसोली येथे मोटारसायकलने जाणाऱ्या राजेश प्रजापती (४०) यांच्या अंगावर झाड पडून ते जागीच ठार झाले. तर पालघर, शिरगाव येथे जुने झाड कोसळून प्रकाश माळी (५०) या तरुणाचा बळी गेला. अशा अनेक घटना रस्त्यावरील झाडांमुळे घडत असताना प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने नागरिकांना रस्त्यावर चालणेही कठीण आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य रस्त्याला लागून असलेल्या मोठमोठ्या झाडांच्या फांद्या सडून, कुजून, अचानक तुटून विजेच्या तारांवर पडून अनेक वेळा मोठा अपघात होता-होता वाचला आहे. तरी, पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कडेला असलेली झाडे कापण्याची जबाबदारी सक्षम शासकीय यंत्रणेवर सोपविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. (वार्ताहर)