शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

गटारींच्या झाकणांचे पैसे खाल्ले कुणी? नालासोपाराकरांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 23:04 IST

लोकांच्या नागरी समस्येच्या नावावर घोटाळे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपावरून नेहमी चर्चेत राहणाऱ्या वसई विरार शहर महानगरपालिका आता गटारावरील झाकणांमुळे आता पुन्हा चर्चेत आली आहे.

नालासोपारा : लोकांच्या नागरी समस्येच्या नावावर घोटाळे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपावरून नेहमी चर्चेत राहणाऱ्या वसई विरार शहर महानगरपालिका आता गटारावरील झाकणांमुळे आता पुन्हा चर्चेत आली आहे. करोडो रुपये खर्च केले असून शहरातील रस्त्यातील गटारावरील झाकणे गायब असल्याने मनपावर घोटाळा केल्याचा आरोप केला जात आहे. वसई, विरार, नालासोपारा विभागातील छोट्या मोठ्या गल्ली बोळातून जाणाऱ्या रस्त्याच्या किनाºयाला असणाऱ्या गटारावरील झाकण गायब झाल्याने अपघाताला जणू निमंत्रणच दिले जाते आहे. सध्याच्या स्थितीमध्ये गटारांच्या साफसफाई आणि डागडुजी साठी मनपा करोडो रुपये खर्च करत असलेला दावा खोटा ठरत आहे.

मनपाच्या सार्वजनिक बांधकाम अभियंता राजेंद्र लाड यांनी लोकमतला सांगितले आहे की, मनपाच्या ९ प्रभागाअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर दरवर्षी गटारांच्या डागडुजीकरीता आणि नवीन झाकणे बनविण्यासाठी मागील वर्षी अनुक्र मे ४ कोटी आणि २ कोटी खर्च केले होते पण या वर्षी गटारांची डागडुजी करण्यासाठी व नवीन बनविण्यासाठी ५ करोड आणि ढाकणांसाठी ५ करोड रुपयांची तरतूद केली आहे. गटारावरील लोखंडी झाकणे चोरीला जातात म्हणून आता फायबरची झाकणे गटारावर टाकली जात असल्याचेही सांगितले. पण हा मनपा करत असलेला खर्च फक्त कागदावरच दिसत असून वस्तुस्थिती काही वेगळीच असल्याचे दिसून येत वसई विरार मनपा हद्दीमधील गटारावरील शेकडो झाकणे गायब तर काही तुटलेल्या स्थितीत आहे.

मनपा ही सर्व कामे ठेकेदारांमार्फत करून घेते. परंतु ठेकेदार निकृष्ट दर्जाचे सामान आणि झाकणे बसवून मनपाला चुना लावत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून हे लोकांच्या जीवाशी खेळत असल्याचेही सांगितले. असाच प्रकार ८ दिवसांपूर्वी वसई गावातील चिमाजी अप्पा मैदानाच्या बाजूला असलेल्या नाल्यावरील झाकण नसल्यामुळे १० वर्षांचा मुलगा नाल्यात पडून गंभीर जखमी झाला होता. मनपा फक्त कागदावर या ठेकेदारांवर कारवाई करते मनपाचे अधिकारी आणि ठेकेदार गटारावरील झाकणांचे पैसे खातात असा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

नाल्यावरील झाकणे गायब आणि तुटलेली...

विरार पूर्वेकडील सहकार नगर, फुलपाडा, कातकरी पाडा, चंदनसार रोड तर पश्चिमेकडील गोकुळ टाऊनशीप, बोलींज, एम. बी. इस्टेट, स्टेशन रोड परिसर, नालासोपारा पश्चिमेकडील सोपारा गाव, टाकीपाडा, समेळ पाडा, पांचाळ नगर, श्रीप्रस्था, पूर्वेकडील आचोळे रोड, डॉन गल्ली, मोरेंगाव, ओसवाल नगरी, नगीनदास पाडा, संतोष भवन, तुळींज रोड, विजय नगर, प्रगती नगर, अलकापुरी, श्रीराम नगर, वसई पश्चिमेकडील वसई गाव, माणिकपूर, आनंद नगर, लिंक रोड, वसंत नगरी, कोळीवाडा, भाभोळा नाका अशा अनेक विभागातील अंदाजे पाचशे ते सहाशे झाकणे तुटलेली असून शेकडो झाकणे गायब आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार