शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षातील निधी गेला कुठे?

By admin | Updated: December 9, 2015 00:32 IST

या तालुक्यात गेल्या दहा वर्षात पाणी आडवा पाणी जिरवा योजनेवर कोट्यावधीचा खर्च करण्यात आला आहे.वन विभाग, जिल्हा परीषद, सामाजिक वनीकरण,कृषी विभाग

श्याम राऊत,  टोकावडे/मुरबाड या तालुक्यात गेल्या दहा वर्षात पाणी आडवा पाणी जिरवा योजनेवर कोट्यावधीचा खर्च करण्यात आला आहे.वन विभाग, जिल्हा परीषद, सामाजिक वनीकरण,कृषी विभाग,लोकनिधींचे आर्थिक योगदान, श्रमदान,अशा प्रकारे अनेक योजना राबवून ,नदी नाल्यावर माती बंधारे,सिमेंट बंधारे,नाला बंडींगच्या माध्यमातून पाणी अडवण्याची कामे करण्यात आलीत.मात्र १९७२नंतर प्रथमच पाणी टंचाई,आणि दुष्काळ दिसू लागल्याने, नवीन बंधारे बांधले जावेत असे प्रशासनाला वाटू लागले आहे. त्यामुळे बंधारे बांधण्याचा खटाटोप शासकिय यंत्रणा करीत आहे.मात्र दहा वर्षात केलेला लाखोंचा खर्च गेला कुठे याचा शोध शासनाने घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तालुक्यात २२७ महसूल गावात नदी नाल्यावर ठिकठिकाणी जिल्हा परिषद, लघु पाटबंधारे, वनी विभाग, कृषी विभाग,सामाजिक वनीकरण,पाणलोट क्षेत्र विकास,योजनाच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात कोट्यावधींचा खर्च पक्के बंधारे,माती बंधारे,नाला बडींग,वनीकरण,यावर करण्यात आला.केलेली कामे कशी होतात . याची देखरेख वरिष्ठ अधिकारी , ग्रामपंचायत सदस्य, आमदार, खासदार अशांची असतांना केवळ कार्यकर्ते पोसण्यासाठी त्यांच्या कडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असते.तर अधिकारी टक्केवारीच्या भागिदारीमु्ळे ठेकेदाराना पाठीशी घालण्यात ते धन्यता मानत असल्याने केलेली कामे चांगली कशी होणार? त्यामुळे बंधाऱ्यांच्या वरून पाणी जाण्या ऐवजी खालून पाणी जाते.आता ठाणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी जिल्ह्यातील नागरीकांना श्रमदानातून वन बंधारे बांधण्याचे आवाहन केले होते.त्याला नागरिकानी उस्फूर्त प्रतिसाद देऊन ,नदी नाल्यावर बंधारे बांधले. १९७२ नंतर ठाणे जिल्ह्यात पाण्याची समस्या उध्भवणार असल्याने प्रशासन जागे झाले .परंतु दहा वर्षात किती कोटी खर्च पाण्यावर झाले याचा शोध कर्तव्य कठोर जिल्हाधिकारी जोशी मॅडम यांनी घ्यावा असे नागरिकांचे मत आहे. मागील कालावधीतील या कामांचा आढावा घेतल्यास ,पाणी जिरवण्याऐवजी पैसे जिरवले, असेच चित्र आहे.