शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 01:25 IST

शाळा सुरू झाल्यानंतर जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांना गणवेश देण्याऐवजी त्याचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. या विद्यार्थ्यांची खाती नसल्याने गणेवशही नाही आणि पैसेही नाही अशी स्थिती ओढावली आहे. 

जव्हार : शाळा सुरू झाल्यानंतर जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांना गणवेश देण्याऐवजी त्याचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. या विद्यार्थ्यांची खाती नसल्याने गणेवशही नाही आणि पैसेही नाही अशी स्थिती ओढावली आहे.  या तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २४५ शाळा असून त्यात १३ हजार ३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची बँकेत खाती उघडायची झाल्यास कोणतीही बँक इतके फॉर्म उपलब्ध करून देणार नाही. या प्रक्रियेसाठी काही महिने जातील.  त्यामुळे विद्यार्थांना शालेय गणवेश वेळेत मिळणार नाही. तसेच जिल्हा परिषद विद्यार्थ्यांच्या पालकांची शिष्यवृत्तीसाठी स्वतंत्र्य खाती असतांना, आता पुन्हा शालेय गणवेशाचे प्रत्येक मुलांचे स्वतंत्र खाते कशासाठी? असा प्रश्न पालकांकडून विचारला जात आहे. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांसाठी गणवेश शाळा व्यवस्थापन समिती  दरवर्षी  खरेदी करीत होती. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थांना  प्रत्येकी दोन गणवेश जुलै अखेर मिळत होते. परंतु यावर्षी जिल्हा परिषदेने प्रत्येक विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडून त्यांच्या खात्यावर शाळेने पैसे जमा करावेत असा आदेश दिला. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांत शिक्षण घेणा-या विद्यार्थी व पालकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. त्यामुळे जि. प. विद्यार्थांना शालेय गणवेश मिळणार तरी कधी? अशी समस्या निर्माण झाली आहे.जिल्हा परिषद शालेय विद्यार्थ्यांचे दोन गणवेशाचे पैसे दरवर्षी शाळेच्या कमेटीच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत होते. मात्र यावर्षी फक्त एकाच गणवेशाचे पैसे जमा झालेले आहेत. दरवर्षी सर्व विद्यार्थ्यांचे गणवेश एकत्र शिवल्यामुळे त्यात एकसूत्रीपणा असायचा. आता प्रत्येक विद्यार्थी आणि पालक कोठून कपडे घेणार?  किंवा शिलाई कोठे करणार?  का कपडे रेडिमेड घेणार यावर नियंत्रण कसे ठेवणार? वेळेवर गणवेश खरेदी न केल्यास जबाबदार कोणाला धरणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.