शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांची ससेहोलपट थांबणार कधी?

By admin | Updated: February 3, 2016 02:05 IST

तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातल्या नोकर भरतीमध्ये केंद्र सरकार व न्युक्लिअर पॉवर कॉरपोरेशन आॅफ इंडियाने प्रकल्पग्रस्तांचा विश्वासघात केल्याने प्रकल्पग्रस्तांसाठी लढा देणारे उत्तर प्रदेशचे राज्यपाल

हितेन नाईक, पालघरतारापूर अणुऊर्जा प्रकल्पातल्या नोकर भरतीमध्ये केंद्र सरकार व न्युक्लिअर पॉवर कॉरपोरेशन आॅफ इंडियाने प्रकल्पग्रस्तांचा विश्वासघात केल्याने प्रकल्पग्रस्तांसाठी लढा देणारे उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी लक्ष घालावे अशी मागणी पोफरण फिशरमेन्स सहकारी संस्थेचे चेअरमन वासुदेव नाईक यांनी केली आहे.तारापुरच्या न्युक्लिअर पॉवर कॉरपोरेशन आॅफ इंडिया या प्रकल्पात असिस्टंट जनरल पदासाठी सात जागा, असिस्टंट जनरल पदासाठी सहा जागा, असिस्टंट जनरल सी. एॅड. एम. एम. पदासाठी एक जागा, स्टेनो (जनरल) पदासाठी एक जागा, फार्मासिस्ट पदासाठी एक जागा अशा बावीस पदाच्या भरतीसाठी जाहीरात काढण्यात आली होती. ही जाहीरात देशातील बहुतांश वृत्तपत्रातून इंग्रजीमध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून देशभरातून मोठ्या प्रमाणात अर्ज येणार असले तरी त्यामुळे स्थानिक भूमीपुत्रांवर अन्याय झाला आहे.पालघर जिल्ह्यातील तारापुर अणुऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीसाठी १९६२ साली घिवली, पोफरण गावातील मच्छीमार शेतकरी इ. स्थानिकांच्या जमीनी व घरे शासनाने ताब्यात घेऊन त्यांना विस्थापित करण्यात आले. त्यावेळी स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये सामावून घेतले जाईल असे आश्वासन तात्कालीन केंद्र सरकारसह राज्य सरकार व न्युक्लिअर पॉवर कॉरपोरेशनने दिले होते. परंतु ५४ वर्षाचा कालावधी उलटूनही प्रकल्पग्रस्तांना ना नोकऱ्या मिळाल्या ना व्यवस्थित मोबदला. या प्रकल्पग्रस्तांवरील झालेल्या अन्यायाविरोधात स्वत: रामनाईक तत्कालीन शासनाविरोधात न्यायालयात लढा देत होते. ते स्वत: आता उत्तरप्रदेशचे राज्यपाल म्हणून विराजमान असताना व केंद्रात व राज्यात भाजपा-सेनेची सत्ता असताना हे प्रश्न अजून सुटत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)