शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

वसईतील गृह घोटाळ्यावर कारवाई होणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 23:25 IST

औद्योगिक वापरासाठी आरक्षित जमिनीवर रहिवासी संकुल : अधिवेशनात प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता

नालासोपारा : वसईच्या पूर्वेकडील गोखिवरे गावाजवळील फादरवाडी परिसरात औद्योगिक वापरासाठी आरक्षित जमिनीवर रहिवासी संकुल उभारुन सदनिकाधारकांची फसवणूक करून वसईत मोठा गृहघोटाळा उघडकीस झाल्याची बातमी ‘लोकमत’च्या ६ डिसेंबरच्या अंकात प्रसिद्ध झाली होती. महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने रीतसर पत्रव्यवहार करून या बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश ‘जी’ प्रभागाच्या सहाय्यक आयुक्तांना दिले होते. पण या आदेशाला हरताळ फासत कारवाईसाठी त्यांना मुहूर्तच सापडत नाही. दरम्यान, या घोटाळ्याचा प्रश्न नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत चौकशी करून तत्काळ कारवाई करण्यासाठी वसई-विरार महापालिकेला सांगितले असल्याची माहितीही समोर येत आहे.

या इमारती बांधून सामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या शांती होम्स रियल्टी या बांधकाम विकासकावर सहाय्यक आयुक्तांच्या तक्र ारीवरुन वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरीही कारवाई का होत नाही, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. कारवाई केव्हा करणार यासाठी ‘जी’ प्रभागचे सहा. आयुक्त प्रशांत चौधरी यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.

वसई पूर्वेकडील फादरवाडी परिसरात शांती होम रिअ‍ॅल्टिीने गाव मौजे गोखिवरे, सर्व्हे क्र . २२६, २२७ हिस्सा क्र .२, ३, ४, ५ व सव्हे क्र . २२८ मध्ये एक रहिवासी संकुल उभारले आहे. बांधकाम व्यावसायिकाने ९ इमारतींच्या प्रकल्पासाठी मनपाकडे बांधकाम परवानगीसाठी अर्ज केला होता. त्याला अनुसरुन मनपाच्या नगररचना विभागाने २०१६-२०१७ मध्ये वीवीसीएमसी/टीपी/आरडीपी/वीपी-५५४५/०५६/२०१६/२०१७ अशी बांधकाम परवानगी दिली होती. परंतु हा प्रकल्प ज्या जागेवर उभारण्यात आला ती जागा औद्योगिक वापरासाठी आरक्षित आहे. त्याच बरोबर वसई- १ येथील महाराष्ट्र शासन नोंदणी व मुद्रांक विभागातून कागदपत्रे काढली असता त्यात या इमारतीतील युनिट (गाळे) हे सदनिका क्र मांक असे लिहून विकले गेले आहेत. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार गंभीर असतानाही नगररचना विभागातील अभियंत्यांनी बिल्ंिडगला ओसी दिली. विशेष म्हणजे या इमारतीला पालिकेने फायर सर्टिफिकेट, घरपट्ट्या व नळजोडण्या देखील दिल्या आहेत.

या इमारतीला स्टॉप वर्कची नोटीस दिली असून ओसी सुद्धा रद्द करण्यात आली आहे. कारवाई करण्यासाठी रीतसर पत्र ४ जून २०१९ ला सहाय्यक आयुक्तांना पाठवले आहे. पण अद्याप कारवाई झाली नाही, याची कल्पना मला नसून तुम्ही याबाबत आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्तांना विचारावे.- संजय जगताप, प्रभारी उपसंचालक, नगररचना विभाग, वसई विरार महानगरपालिका