तलवाडा : उन्हाळयाच्या सुरुवातीपासूनच मार्च, एप्रिल, मे़ या महिन्यात सर्वत्र पाणीटंचाईची झळ बसत आहे़ मात्र या पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी विक्रमगड जवळच साखरे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात देहरजी मध्यम प्रकल्प उभारण्यात येत आहे़ या प्रकल्पाचा फायदा विक्रमगड व आसपासच्या परिसरातील गाव-खेडयापाडयांसही २२ गावांना होणार आहे़मात्र या प्रकल्पाला निधी बरोबरच वारंवार इतर अनेक अडचणी, त्रुटी उदभवत असल्याने प्रकल्पाचे काम अद्यापही सुरु करण्यांत आलेले नाही़ त्यामुळे हा प्रकल्प कधी साकारणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे़ सन-२००५ पासून या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे़ परंतु या प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांसमवेत वन विभागाची जमीनही संपादीत होत असल्याने प्रथम त्यांची मान्यता मिळणे गरजेचे होते त्यानंतर त्यांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर निधी मिळणे तसेच अनेक अडचणी येत असल्याने या प्रकल्पाचे काम अध्यापही मार्गी लागण्यास विलंब होत आहे़ देहरजी मध्यम प्रकल्प जव्हार राज्य मार्गावर विक्रमगड गावापासुन आठ कि़मी अंतरावर असून, जांभा गावापासुन १५० कि़ मी़ अंतरावर देहरजी नदीवर आहे़हा प्रकल्प पालघर जिल्हयातील अतिदुर्गम व डोंगराळ आदिवासी भागात आहे़ या प्रकल्पाकरीता लागणाऱ्या एकुण जमीनीपैकी ५३१.१८६ हे वनजमीन व २७५७४८ हे खाजगी जमीन अषी एकुण ८०६.९३४ हेक्टर जमीन आवश्यक आहे़ या प्रकल्पास कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने १५८२५.१४ लक्ष इतक्या रक्कमेस यापूर्वीच प्रशासकीय मान्यता दिली आहे़ या प्रकल्पाची एकुण पाणी साठवण क्षमता ९५.६० द़ ल़ घ़ मी़ ८३.३८ टी़ एम़ सी़ असून पिण्यासाठी १५ टक्के प्रमाणे १३.९८६ द़ ल़ घ़ मी़ व औद्योगिक वापरासाठी १० टक्केप्रमाणे ९.३२४ द़ ल़ घ़ मी़ पाण्याची तरतूद करण्यांत आली आहे़ धरणाची महत्तम उंची ६६.८२ मी़एवढी असून एकुण लांबी २२५४ मी़ आहे़ डाव्या कालव्याची लांबी चार कि़ मी़ असून ३८१ हेक्टर एवढे क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे़ तसेच उजव्या कालव्याची लांबी २९ कि़ मी़ असुन ३८४९ हेक्टर एवढे क्षेत्र सिंचनाखाली येते एकुण ४२२० हेक्टर जमीनीचे क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. देहरजी मध्यम प्रकल्पाचे धरण, कालवा व आनुशंगिक कामांच्या निविदेता मंजुरी देण्यात आलेली असून, संबंधित कामे एऩ पी़ व्ही़ आऱ प्रोजेक्ट लि़ पुणे यांना देण्यात आले आहे़ सन-२००५ च्या या कामाच्या निविदेप्रमाणे त्यावेळीप्रमाणे कामाचा अपेक्षित खर्च रक्कम रुपये १०३३२ कोटी एवढा आहे व वाढत्या कॉस्ट नुसार तो वाढत गेला आहे़ (वार्ताहर)
देहरजी प्रकल्प केव्हा साकारणार ?
By admin | Updated: January 7, 2016 00:26 IST