शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईसाठी मुहूर्त कधी सापडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 23:22 IST

अनधिकृत गाळे पाडणार कधी? : अहवाल देऊन दोन महिने उलटले; नागरिक राहतात जीव मुठीत धरून

लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील वसई फाटा येथील सेठीया इंडस्ट्रीजमधील काही औद्योगिक गाळे हे महसूल खात्याच्या नवीन शर्तीच्या जमिनीवर उभारले आहेत. या इंडस्ट्रीजच्या २० ते २५ फूट उंचीच्या झुकलेल्या संरक्षक भिंतीमुळे शिवापाडा परिसरातील स्थानिक जीव मुठीत धरून राहत आहेत. पुण्यात आणि मालाड शहरात संरक्षक भिंत कोसळून अनेकांनी आपला जीव गमावल्याची दुर्घटना घडल्याने स्थानिकांनी जिल्हाधिकारीपासून तहसीलदारापर्यंत याबाबत अनेक तक्रारी केलेल्या आहेत. पण तहसीलदारांनी १५ जुलैला या भिंतीवर नाममात्र कारवाई केली होती. ती भिंत पुन्हा बांधण्यात आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या संरक्षक भिंतीवर आणि अनधिकृत गाळ्यांवर कारवाई करण्यासाठी वसईचे तहसीलदार किरण सुरवसे यांना अद्याप मुहूर्त सापडत नाही का, अशी विचारणा नागरिक करत आहेत.

वसई फाटा येथे शिवापाडा गाव असून शेकडो गरीब परिवार चाळीमध्ये राहतात. यात मोठ्या प्रमाणात आदिवासींचा समावेश आहे. या गावाच्या आसपास काही जमीन सरकारी आहे. या सरकारी जमिनीवर अनधिकृत पद्धतीने मोठ-मोठ्या इंडस्ट्रीज बनविण्यात आल्या आहेत. या कंपनीच्या संरक्षक भिंती गावातील घरांच्या बाजूनेच बनवण्यात आल्या आहेत. काही भिंती तर झुकलेल्या परिस्थितीत आहेत. येथे राहणाऱ्या रहिवाशांनी सांगितले की, बाजूलाच सेठीया इंडस्ट्रीयल कंपनीची भिंत झुकली असून ती घरांवर कधीही पडू शकते. आजूबाजूला लहान मुले खेळत असल्याने कधी कोणती दुर्घटना घडू शकते. म्हणून मुलांना त्याठिकाणी खेळायला जाण्यास विरोध केला जातो. या कंपनीची भिंत यापूर्वीही पडली आहे. यामुळे याबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत.

मंडळ, तलाठ्याने सर्व्हे केला, पण कारवाई नाही : सेठीया इंडस्ट्रीजच्या अनधिकृत गाळ्यांचा पंचनामा करून त्याचा अहवाल पेल्हार तलाठीने तहसीलदारांना १६ जून २०१९ ला पाठवला आहे. तर मांडवी येथील मंडळ अधिकारी सुशांत ठाकरे यांनी या जमिनीवरील बांधकामाबाबत कुठल्याही शासकीय प्रकारची परवानगी नसल्याने कारवाई करावी, असा अहवाल तहसीलदारांना ६ जुलै २०१९ ला पाठवला आहे. ही वन खात्याकडील जमीन अल्प भूधारक व भूमिहीन आदिवासी लोकांना वाटण्यासाठी महसूल खात्याच्या ताब्यात दिली होती पण महसूल अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे येथे बांधकामे झाली. तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी तहसीलदारांना अहवाल पाठवूनही दोन महिने उलटले. तरीही कारवाई होत नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.नेमके काय आहे अहवालात : मौजे पेल्हार येथील सर्व्हे नंबर ३२४ मधील क्षेत्रफळ ३६ या वर्णनाची जमीन कब्जेदार सदरी एकनाथ महादेव शेलार यांच्या नावे दाखल आहे. या जागेमध्ये अनधिकृत बांधकाम झालेले असून सदर बांधकामाबाबत जमीन मालक आणि बांधकाम व्यावसायिकाना विचारणा केली असता त्यांच्याकडे शासकीय अकृषिक परवानगी अथवा वसई विरार शहर महानगरपालिकेची बांधकाम करण्यासाठी कोणत्याही शासकीय प्रकारची परवानगी नाही. सदर जमिनीचे आणि कंपनीचे पंचनामा करून कारवाई करण्यासाठी तहसीलदारांना अहवाल पाठवला आहे. याबाबत तहसीलदारांना संपर्क साधला असता आपण तुंगारेश्वर येथे कारवाईदरम्यान असून यासंदर्भात नंतर बोलू असे त्यांनी सांगितले. मात्र, नंतर त्यांचा फोन आऊट आॅफ रिच लागत होता. 

सदर जमीन ही महसूलची असून तहसीलदार कार्यालयातून अजूनपर्यंत कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केलेला नाही. जर आमच्या कडे त्यांनी पत्रव्यवहार केला तर नक्कीच अनिधकृत बांधकामावर कारवाई करणार.- प्रशांत चौधरी,सहाय्यक आयुक्त, वालीव प्रभाग