शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बोया बसविणार कधी?

By admin | Updated: August 12, 2016 01:30 IST

सातपाटी, मुरबे येथून समुद्रात मासेमारिला जाताना धोकादायक खड्का पासून बचाव व्हावा, यासाठी समुद्रात

पालघर : सातपाटी, मुरबे येथून समुद्रात मासेमारिला जाताना धोकादायक खड्का पासून बचाव व्हावा, यासाठी समुद्रात उभारलेला बोया मागील दोन महिन्यापासून शिरगावच्या किनाऱ्यावर बेवारस अवस्थेत तसाच पडून आहे. हा बोया पुन्हा मूळ जागेवर लावण्या संदर्भात मेरी टाईम बोर्डाला कळवूनही तो तसाच पडून आहे. त्यामुळे एखादा अपघात घडल्यास संबंधीत अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी मच्छीमारांमधून केली जात आहे.सातपाटी हे एक प्रगतीशील बंदर असून मुरबे, सात पाटी, खारेकुराण या बंदरातून सुमारे ३०० ते ४०० लहान मोठ्या नौकांद्वारे मासेमारी केली जाते. सातपाटी खाडीत अनेक वर्षा पासून गाळ साचून अनेक धोकादायक खडक निर्माण झाले असून त्यापासून नौकांचे रक्षण व्हावे म्हणून नौकानयन मार्गासह समुद्रात अनेक ठिकाणी दीपस्तंभ आणि लाईट बोये बसविण्यात आले होते. माजी आमदारांच्या फंडातून समुद्रात (धावती पट्टा) बसविलेला बोया २० ते २५ जून दरम्यान तुटून शिरगावच्या समुद्रकिनारी बेवारस पडून होता. १ आॅगस्ट पासून मासेमारी हंगामाला सुरु वात झाली असल्याने व त्या दरम्यान समुद्रात जोरदार वारे वाहून मोठ्या लाटा उसळत असल्याने समुद्रात मासेमारिला जाणाऱ्या नौकांना या धोकादायक खडकांचा अंदाज न आल्यास मोठ्या जीवित आणि आर्थिक नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. सातपाटी सर्वोदय सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुरेश म्हात्रे यांनी मेरिटाईम बोर्डाला पत्र देऊन तात्काळ कार्यवाही करून हा बोया लावून द्यावा ही मागणी करूनही मेरिटाईम बोर्ड मात्र टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे जर समुद्रात एखादी नौका खडकावर आदळुन अपघात झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी मच्छीमारां मधून केली जात आहे. (प्रतिनिधी)