शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण गैरव्यवहारप्रकरणी कारवाई कधी? विधिमंडळात तारांकित प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 00:33 IST

सफाळे परिसरातील उपकार्यकारी अभियंत्याने केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करुन त्या विरोधात कारवाई करण्या संदर्भात नुकताच नागपूर येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात तारांकीत प्रश्न उपस्थित झाला आहे.

- आरिफ पटेल।मनोर : सफाळे परिसरातील उपकार्यकारी अभियंत्याने केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करुन त्या विरोधात कारवाई करण्या संदर्भात नुकताच नागपूर येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात तारांकीत प्रश्न उपस्थित झाला आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर या प्रकरणाच्या चौकशीचे आश्वासन उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.या प्रकरणी पालघर जिल्हा कॉँग्रेसचे सरचिटणीस महेंद्र देसाई यांनी विरोधीपक्ष नेत्यांकडे तक्रार केली होती. महावितरणचे कनिष्ठ अभियंते भैरवनाथ पाटील व इतर कर्मचाऱ्यांनी वीज वितरणाच्या कामामध्ये केलेल्या गैरप्रकाराला या मुळे वाजा फुटली असून या चौकशीच्या फेºयामध्ये अनेक जण अडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सफाळे भागातील सदनिकांना नियमबाह्य वीज जोडण्या देणे, एकच घर नंबर असणाºया एकाच ग्राहकाला एका पेक्षा अधिक वीज जोडण्या देणे, ग्राहकांना कोणतीही नोटीस न देता मीटर काढून नेणे, वर्ष २०१० च्या काळात अनेक शॉट सक्रीट होऊन अनेक जण दगावण्याच्या घटना, तसेच या घटनांची चूकीची रिपोर्टींग करुन वरिष्ठांची व नागरिकांनी दिशाभूल करणे आदी आरोपांची उल्लेख त्यात आहे. त्याशिवाय उप कार्यकारी अभियंता हे गत पाच वर्षांपासून एका जागी असून त्यांची बदली कधी होणार असा मुद्दा ही या निवेदनामध्ये आहे.त्या अनुशंगाने विखेपाटील यांनी तारांकीत प्रश्न (४३८२५) उपस्थित केला. अशोक उर्फ भाई जगताप, शरद रणपिसे, संजय दत्त, रामहरी रु पणवर श्रीमती हुसनबानू खिलफे या आमदारांनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे या संदर्भात खुलासा मागितला होता. त्यावर उर्जा मंत्री म्हणाले की, ‘होय हे अंशत: खरे आहे. या गैरव्यवहाराची चौकशी दि.१७ मे २०१८ रोजी करण्यात आली आहे.आता प्रशासन काय कारवाई करतेया प्रकरणी मला चौकशीचा अहवाल प्राप्त झाला असून त्या वर पुढील योग्य ती कार्यवाही मुख्य अभियंता कल्याण परिमंडळ यांच्या स्तरावर करण्यात येईल.’ या उर्जामंत्र्याच्या उत्तरानंतर दोषींवर काय कारवाई होते या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बोगस वीज जोडण्यामुळे महावितरणचे मोठे नुकसान होत असल्याचे पुन्हा स्पष्ट होत आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार