शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम रेल्वेकडून मराठीचा अवमान?

By admin | Updated: April 1, 2017 05:11 IST

पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबईत असूनही पश्चिम रेल्वे महाराष्ट्राच्या राजभाषेचा हेतुपुरस्पर दुजाभाव करून

वसई : पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबईत असूनही पश्चिम रेल्वे महाराष्ट्राच्या राजभाषेचा हेतुपुरस्पर दुजाभाव करून अवमान करीत असल्याची तक्रार रेल्वे मंत्र्यांकडे करण्यात आली आहे. १९६५ च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ५ (महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४) अन्वये मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात आला आहे. तिची लिपी देवनागरी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यानंतर मराठी भाषा ही वर्जित प्रयोजना व्यतिरिक्त इतर प्रयोजनासाठी राज्यात उपयोगात आणावयाची भाषा झाली. भारताच्या संविधानाच्या अनुसूची ८ मध्ये एकूण २२ भाषांचा निर्देश असून त्यात मराठी भाषा १३ व्या क्रमांकावर आहे. मराठी हा राजभाषा असल्याचे घोषित करणारा कायदा विधीमंडळात मंजूर होऊन ११ जानेवारी १९६५ ला राजपत्रातून जाहीरही करण्यात आले. तरीही पश्चिम रेल्वेकडून राजभाषेचा अवमान केला जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. डहाणू ते बोरीवली दरम्यान रेल्वे स्थानकांवरील तक्रार पुस्तिकेत मराठी पर्याय उपलब्ध नसणे, डहाणू ते चर्चगेट स्थानकांवर मराठीत उद्घोषणा न करणे, गाड्यांवर मराठी पाट्या नसणे, तिकीटे व त्यावरील सूचना मराठीत नसणे, रेल्वेच्या इमारतींवर मराठीत नाव नसणे, उपहार गृहे, खानपान केंद्रात मराठीचा वापर न करणे, माहिती अधिकार, तक्रारी, टिष्ट्वटर, इमेल आणि वेब साईटमधून मराठीतील तक्रारींना उत्तरे न देणे हा मराठीचा अवमान असल्याची तक्रार रेल्वेमंत्र्याकडे त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)