शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील आठवडाबाजारांना नोटाबंदीचा फटका

By admin | Updated: December 22, 2016 05:27 IST

आदिवासी व ग्रामीण भागातील आठवडा बाजारांना नोटाबंदीचा फटका बसला असून सुट्टया पैशाच्या तुटवडयामुळे बाजारातील

कासा : आदिवासी व ग्रामीण भागातील आठवडा बाजारांना नोटाबंदीचा फटका बसला असून सुट्टया पैशाच्या तुटवडयामुळे बाजारातील खरेदी विक्रीवर मोठा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आठवडाभराची खरेदी करणाऱ्या मजूरी, रोजंदारी करणाऱ्या ग्राहकांबरोबरच गरीब कुटुंबातील ग्राहकांची मोठी अडचण झाली आहे.डहाणू तालुक्यातील आदिवासी व ग्रामीण भागातील कासा, वाणगांव, आशागड, गंजाड, धुंदलवाडी, वरोती, तवा, बापूगाव, सायवन आदि ठिकाणी आठवडा बाजार भरतात. या आठवडा बाजारात कांदा बटाटा, हिरवा भाजीपाला, तसेच स्थानिक शेतकऱ्यांचा भाजीपाला विक्री दुकाने असतात. त्याचबरोबर कपडे, भांडी, रोजच्या आहारातील वस्तू, घरगुती वापराच्या विविध वस्तू, लग्नसमारंभातील काही वस्तू विक्रीसाठी दुकानदार फेरीवाले आणतात. ग्रामीण भागातील वीट भट्टी, ट्रक हमाली, बांधकाम, रस्ते आदी ठिकाणी काम करणाऱ्या मजूर वर्गाची खरेदीची मदार या आठवडा बाजारावरच असते. त्यामुळे मजुरांचा आठवड्याचा पगार किंवा खर्चही बाजाराच्या दिवशी व्यवसायिक करतात. हे मजूर आठवडाभर लागणारे धान्य भाजीपाला व वस्तू बाजारातून खरेदी करातात. तसे परिसरातील नागरिकही आठवडा बाजारातून आठवडयाची खरेदी व विविध जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतात. तसेच गरीब कुटुंबे लग्नसमारंभासाठी लागणाऱ्या वस्तू व अन्नधान्य घटक बाजारातूनच खरेदी करतात. त्यामुळे ग्रामिण व आदिवासी भागातील नागरिकांची खरेदी आठवडाबाजारावरच अवलंबून असते. मात्र महिनाभरापूर्वी झालेल्या १००० व ५०० रू नोटा बंदीमुळे चलन टंचाई निर्माण झाली असून सुट्ट्या पैशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. बँकामधून २००० रू.च्या नोटा दिल्या जात असल्याने व्यावसायिकांकडून मजूरांना खर्चापोटी २००० रूपये दिले जातात. सुट्ट्या पैशाच्या तुटवडयामुळे परिसरातील नागरिक २००० रूपयांच्या नोटा बाजारात खरेदीसाठी नेतात. दरम्यान, बाजारातून २० रू ३० रू टॉमेटो, कांदा, वांगी, बटाटे आदी भाजी विक्रेते प्रत्येक ग्राहकास एवढ्या मोठया मोठया सुट्या नोटा देऊ शकत नाही. (वार्ताहर)