शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

जव्हार रुग्णालयात पाणीबाणी

By admin | Updated: May 22, 2016 01:23 IST

‘कोणी प्यायला पाणी देता का पाणी’ म्हणत दारोदार पाण्याची भिक्षा मागण्याचा दुर्देवी प्रसंग सध्या जव्हार ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांवर ओढवला आहे.

हुसेन मेमन,  जव्हार‘कोणी प्यायला पाणी देता का पाणी’ म्हणत दारोदार पाण्याची भिक्षा मागण्याचा दुर्देवी प्रसंग सध्या जव्हार ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांवर ओढवला आहे. ग्रामीण रुग्णालयात पाण्याचा थेंब नसल्याने रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्यासाठी दारोदार फिरावे लागत आहेच परंतु अतिशय संतापाची बाब म्हणजे जे उपचारासाठी दाखल आहेत त्या रुग्ण महिलांना स्वत:च्या आजारपणाची पर्वा न करता घोटभर पाण्यासाठी भर उन्हात वणवण करावी लागते आहे . पाणीटंचाईच्या काळात नगरपरिषदेकडून शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो शिवाय आठवड्यातील दोन दिवस पाणी पुरवठा बंद असतो. तालुक्यातील १ लाख ७२ हजार लोकसंख्येसाठी असलेल्या शासकीय व सुसज्य अशा एकमेव ग्रामीण रुग्णालयासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना नसल्यामुळे तेथे उपचारासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील आदिवासी रुग्णांना, त्यांच्या देखभालीसाठी आलेल्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरश: दारोदार फिरण्याची वेळ आली आहे. हॉस्पिटलच्या परिसरातील रहिवाशांनाच पाणी मिळत नाही तर ते रुग्णांना किंवा त्यांच्या आप्तांना कुठून देणार?जव्हार ग्रामीण रुग्णालयात दररोज सरासरी ३५० रुग्ण तपासणी साठी येतात, त्यातील बराचशा रु ग्णावर भरती करून उपचार करण्याची आवश्यकता असते. परंतु अगोदरच क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण भरती असल्यामुळे अनेकांना ८० कि.मी.दूर असलेल्या नाशिक, ठाणे येथील जिल्हा रुग्णालयात हलवावे लागते. अशा प्रतिकूल परिस्थतीत रुग्णसेवा करीत असले तरी पाणी नाही, लाईट नाही हे वास्तव उरतेच. ही सेवा सुरळीत ठेवण्याचे काम पालिका प्रशासनाचे आहे याचा विचार न करता खापर मात्र हॉस्पिटल प्रशासनावरच फोडले जाते. रुग्णालयात पाण्याची भीषण पाणी टंचाई असताना जव्हार नगरपरिषद त्यांना दिवसाला पाण्याचे दोन छोटे टँकर देते. हे ४००० लिटर्स पाणी तपासणीसाठी आलेले रु ग्ण , भरती असलेले रुग्ण व त्यांचा सोबत आलेले नातेवाईक, कर्मचारी निवासस्थाने यांना पिण्यासाठी तसेच प्राथमिक गरजांसाठी पाणी पुरत नाही.