शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

६४ लाख खच्चूनही डबक्यातलेच पाणी

By admin | Updated: March 12, 2017 02:12 IST

तालुक्यातील कोने-दुपारेपाडा ग्रामपंचायतीत जलस्वराज्य योजने अंतर्गत नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात आली. त्यासाठी ६४ लाख निधी खर्च करण्यात आला

- वसंत भोईर, वाडा

तालुक्यातील कोने-दुपारेपाडा ग्रामपंचायतीत जलस्वराज्य योजने अंतर्गत नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात आली. त्यासाठी ६४ लाख निधी खर्च करण्यात आला असला तरी, आजही येथील गामस्थांना डबक्यातील अशुद्ध पाणी प्यावे लागत असल्याने शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. कोने - दुपारेपाडा ग्रामपंचायतीतील विजयपूर, शिरिषपाडा, जांभूळपाडा व हरणेपाडा या तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावातील व पाडयांसाठी २००८ साली सुमारे ६४ लाख रु पये खर्च करून नळपाणी योजना राबविण्यात आली. त्यावेळी आहळाकिनारी विहीर बांधली व पाण्याचा साठा करण्यासाठी पाण्याची टाकी बांधण्यात आली. काही भागात पाईपही टाकण्यात आले मात्र एवढे करूनही नळपाणी योजना आज पर्यंत पूर्ण होऊ शकली नाही की, नागरिकांना पाणी मिळू शकले नाही. त्यामुळे येथील गावातील लोकांच्या नशिबी आजही डबक्यातील अशुद्ध पाणीच आहे. योजना पूर्ण होऊन नऊ वर्षे झाली तरी पाणी न आल्याने नागरिकांचा भ्रमनिरास झाला. बांधलेली विहीर आता गाळाने भरली आहे. तर पाण्याची टाकी कमकुवत झाली असून ती कधी पडेल याचा नेम नाही. काही भागात पाईप लाईन टाकण्यात आली होती. मात्र, अनेक वर्षानंतरही पाणी येत नसल्यामुळे पाईप चोरीला गेले आहेत. पाणी नसल्यामुळे बैलगाडी किंवा वाहनातून पाणी आणावे लागते. गावातील एक व्यक्ती पाणी विकत असल्याने बाकी सर्व पाणी विकत घेत आहेत आहेत असे नागरिकांनी सांगितले. या योजनेची तातडीने पाहणी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जितेंद्र गायकवाड या ग्रामस्थाने केली आहे. माहिती न मिळाल्याने राज्य माहिती आयोगाकडे अपिल दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, तालुक्यातील अनेक गावांत राबविलेल्या पाणी योजनांचा बोजवारा उडाला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या संदर्भात ग्रामसेवक संजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ही योजना ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिलेली नाही. तत्कालीन ग्रामसेवकाच्या कालावधीत ही योजना राबविण्यात आली होती.त्या बाबतचे कागदपत्रे दप्तरी उपलब्ध नाही. पाण्यापासून नागरिकांचे हाल होऊ नये म्हणून विजयपूर येथे कूपनलिका खोदणार आहोत. तर कोने जांभूळपाडा येथील कूपनलिकांतील पाणी पुरवठा सुरळीत सुरु आहे अशी, माहिती त्यांनी दिली.