शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

न्याहाळेच्या ४ पाड्यांत पाणीटंचाई

By admin | Updated: April 24, 2017 23:46 IST

जव्हार तालुक्यातील न्याहाळे बु. ग्रामपंचायत हद्दीतील चार पाड्यांत पाण्याची भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांनी

जव्हार: जव्हार तालुक्यातील न्याहाळे बु. ग्रामपंचायत हद्दीतील चार पाड्यांत पाण्याची भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांनी महिनाभरापूर्वी टँकरची मागणी पंचायत समितीकडे करूनही टँकर मिळत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. गल्ली पासून दिल्ली पर्यंत आमचे सरकार असूनही आम्हाला पिण्यासाठी पाणी नसल्याची खंत माजी सरपंच जीवा भोगाडे व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, व ग्रामस्थ यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली.१५ कि. मी. वर असलेल्या या ग्रामपंचायत हद्दीतील काष्टीपाडा, मोगरवाडी, मोरिगळा, शिवाकोरड्याचीमेट, या पाड्यांत पाण्याचे दुर्भिक्ष आहे. येथील महिलांना पाण्यासाठी पहाटेपासून नदी, नाले, विहिरींवर वणवण भटकण्याची वेळ आली आहे. दरवर्षी भीषण पाणी टंचाई जाणवत असल्याने येथील ग्रामस्थांनी २९ मार्च रोजी टँकर मागणीचा ठराव करून तो पंचायत समितीकडे पाठविला होता. त्याला आता महिना उलटायला तरी या चार पाड्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा टँकर चालू करण्यात आला नाही. येथील अधिका-यांकडून तहसिलदारांचा पाहणी अहवाल आणा नंतरच पाणी मिळेल असे सांगितले जाते. जव्हार तहसीलदार येथील अधिकारी पाहणी करण्यासाठी महिना लावत असतील ग्रामस्थांनी करायचे काय? असा सवाल ग्रामस्थांना पडला आहे. (वार्ताहर)