शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांची जलप्रदूषण तपासणी

By admin | Updated: January 10, 2017 05:43 IST

तारापूर एमआयडीसीतील उद्योग, सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र (सीईटीपी) आणि पंप नं १, ३ व ४ मधील रासायनिक सांडपाण्याची विशेष तपासणी

पंकज राऊत / बोईसरतारापूर एमआयडीसीतील उद्योग, सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र (सीईटीपी) आणि पंप नं १, ३ व ४ मधील रासायनिक सांडपाण्याची विशेष तपासणी मोहीम शनिवारपासून सुरु करण्यांत आली असून ती १७ जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. त्या करीता महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे विशेष पथक तारापूरला दाखल झाले आहे.या औद्योगीक क्षेत्रातील सामुदायिक सांडपाणी प्रक्रि या केंद्रात (२५ एमएलडी) क्षमतेपेक्षा अतिरिक्त येणारे रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच सरळ नवापूरच्या समुद्रात सोडले जात असल्याने त्याचा गंभीर परिणाम मत्स्य उत्पादन व पर्यावर्णावर होत असल्याची याचिका भारतीय मांगेला समाज परीषदेने पुण्यातील राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल केल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विशेष पथकाद्वारे जलप्रदूषणा च्या पातळीची तपासणी मोहीम हाती घेण्यांत आली होती. त्या नुसार तारापूर औद्योगीकक्षेत्रात गतवर्षी २८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या सहा दिवसात मोहीम राबवून सुमारे शंभर उद्योगांमधील रासायनिक सांडपाण्याचे नमूने घेऊन त्या मधील पीएच, सीओडी, बीओडी ची तारापूर येथील टी. ई. पी. एस. च्या प्रयोग शाळेत तपासणी केली असता त्या मध्ये जलप्रदुषणाचे प्रमाण जास्त आढळलेल्या तीस उद्योगांवर उत्पादन बंदीची कारवाई करण्यात आली होती. ते उद्योग आजही बंदच आहेत. तर आता नव्याने सुरु केलेल्या मोहिमेमुळे अजून काही उद्योगांवर बंदीची कारवाई होण्याची टांगती तलवार असून सध्या सुरु करण्यांत आलेल्या तपासणी मोहिमे दरम्यान, करवाई होऊ नये या भीतीने काही उद्योजक स्वत:हून तात्पुरते उत्पादन बंद किंवा कमी उत्पादन घेण्याची शक्यता आहे.सहा आणि बारा तासांनी घेतलेल्या नमुन्यांची तपासणीतारापूर एम आय डी सीमधील रासायनिक सांडपाण्याचा साठा करणाऱ्या पंप नं १, ३ व ४ तसेच सीईटीपी मधील इनलेट व आउटलेट तर मोठ्या उद्योगांच्या फक्त आउटलेटमधील सांडपाण्याचे नमूने दर सहा तासांनी तर मध्यम आणि छोट्या उद्योगांच्या आउटलेटमधील पाण्याचे नमुने दर १२ तासाने मंडळाचे १४ क्षेत्रीय अधिकारी घेणार असून ते तारापूर येथील प्रयोग शाळेत तपासले जातील.