शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपाऱ्यात पाणी महागले; खाजगी पाणीकंपन्या आणि टँकरवाल्यांकडून सर्वसामान्यांची पिळवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:15 IST

टंचाईच्या काळात आर्थिक लूट

नालासोपारा : उन्हाळा आला की नालासोपाराकरांची पाण्यामुळे तारांबळ होत आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी व घरगुती वापरासाठी आवश्यक असणारे पाणी मिळत नाही. त्यामुळे त्यांना पाण्यासाठी मैलोंमैल पायपीट करावी लागते. गेल्या ४ ते ५ दिवसापासून वसई विरार महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाºया सूर्या जलवाहिनीच्या पावसाळा पूर्व दुरूस्तीचे काम सुरू असल्याने तालुक्यात सर्वत्र पाणी टंचाईची स्थिती आहे. काही ठिकाणी पाणी कमी दाबाने येत असल्याने पाण्याच्या खाजगी कंपन्या व टॅँकरवाल्याचे उखळ पांढरे होत आहे.

सध्या सुरु असलेल्या टंचाईचा गैरफायदा घेत टँकर वाले अव्वाच्या सव्वा पैसे घेवून लोकांची फसवणूक करीत आहेत. काही सोसायटीचे टँकर वाले ठरलेले असून त्यांचा आठशे ते एक हजार रुपये येवढा दर ठरलेला असतो. महानगरपालिकेकडून पाणी सुरळीत मिळत नसल्याचा गैरफायदा घेत हेच टॅँकरवाले सध्या १८०० ते २००० रुपये प्रति टॅँकर वसूली करीत आहेत. तर शुद्धपाण्याच्या नावाखाली व्यवसाय करणाºया काही खाजगी कंपन्या एरवी ३० रूपयाला २० लीटर तर काही कंपन्या ४० रूपयाला २० लीटर पाणी देताता मात्र, सध्याच्या काळात २० लिटर पाणी ५० रु पयाला देऊन सामान्य नागरिकांना पाण्याच्या नावावर अक्षरश: लुटत आहे. यावर महापालिकेने अंकुश लावावा.टँकर लॉबीचा धंदा तेजीत...

नालासोपारा मध्ये अंदाजे २०० ते ३०० टँकर आहेत. हे टँकर बाधकामाना पाणी पुरवतात. आता लोकांना मनपाचा पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे अव्वाच्या सव्वा पैसे घेवून लोकांना टँकर पुरवत आहेत. ८०० ते १००० रु पयांच्या टँकरसाठी आता ते १८०० ते २००० रुपये घेत आहेत. त्यामुळे या टँकर लॉबिचा धंदा तेजीत आहे. दरम्यान, मागणी ऐवढी आहे की, त्यांना आगावू कल्पना दिली तरच विकतचे पाणी मिळते अन्यथा नाही.गेले ४ दिवस दुरु स्तीमुळे पाणीपुरवठा कमी दाबाने...वसई विरार महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाºया सुर्या धरणाच्या जुन्या योजनेची पाईप लाईनला वरई फाटा, ढेकाळे, वाघोबा खिंड, सकवार आणि खानिवडे या ठिकाणी गळती असून पावसाळ्याचा काळ पाहता १५ मे रोजी सकाळी ९ ते १६ मे रोजी रात्री उशिरापर्यंत केली होती. नंतर, पुन्हा वसई विरार शहर महानगरपालिकेस पाणी पुरवठा करणाºया सुर्या धरणाच्या नवीन योजनेच्या धुकटन (पालघर) येथील जलशुद्धीकरण केंद्रा मध्ये तांत्रिक दुरु स्तीसाठी १७ मे रोजी सकाळी ४ पासून १८ मे रोजी रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते.पिण्यासाठी मनपाचे पाणी कमी येत असल्यामुळे टँकरचे पाणी सोसायटीत येते. पण आता टँकर महाग झाल्याने करायचे काय ? मनपाने पाणी पुरवठा सुरळीत केला तर महाग झालेले टँकरचे पाणी स्वस्त होऊन सामान्य नागरिकांना भेटेल.- मालती शिंदे. विजय नगर, नालासोपाराआॅफिसला पिण्याचे पाणी हे खाजगी कंपणीद्वारे मागविले जाते. २० लिटर पाण्याला पूर्वी ३० रु पये दर होता. आता दोन दिवसापासून २० लिटर पाण्याला ६० रु पये मोजावे लागत आहे ही पिळवणूक आहे.- सतीश पटेल, इस्टेट ऐजेन्ट, नालासोपारा पूर्व)कमी दाबाने मनपाचे पाणी येत असल्यामुळे व पाणी पिण्यासाठी पुरत नसल्यामुळे सोसायटीत टँकर मागवतो. पूर्वी प्रती टॅँकर ९०० रु पये दराने पाणी देत असे पण आता या महिन्यापासून टँकरचे पैसे १६०० रु पये झाल्याने सर्व घरांना मेंटनेस जास्त मोजावे लागत आहे.- अनिता प्रभू (स्थनिक रहिवाशी)