शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीतून वसईला का डावलले?

By admin | Updated: August 5, 2015 00:58 IST

सॅटेलाईट सिटी असलेल्या वसई विरारमध्ये गेल्या ५ वर्षात महानगरपालिकेने भरीव विकासकामे केली असताना का वगळण्यात आले असा सवाल नागरीक करीत आहेत

वसई : सॅटेलाईट सिटी असलेल्या वसई विरारमध्ये गेल्या ५ वर्षात महानगरपालिकेने भरीव विकासकामे केली असताना का वगळण्यात आले असा सवाल नागरीक करीत आहेत. अवघ्या ५ वर्षात २४०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या या महानगरपालिकेला या योजनेतून वगळण्यासंदर्भात कोणते निकष लावले याची सध्या माहिती घेण्यात येत आहे.सन २००९ साली महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर केवळ वर्षभरातच या परिसराला सॅटेलाईट सिटीचा दर्जा केंद्र सरकारने दिला तसेच, विकासकामासाठी सुमारे ८०० ते ९०० कोटीचा आर्थिक निधी मंजूर केला. त्यापैकी २ ते ३ हप्ते महानगरपालिकेला सुपूर्द करण्यात आले. मिळालेल्या आर्थिक निधीतून महानगरपालिकेने भूमीगत गटारे व अन्य विकासकामे मार्गी लावली. गेल्या ५ वर्षात महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व अन्य वित्तीय संस्थांच्या माध्यमातून प्रचंड विकासकामे करण्यात आली. त्यामध्ये रस्ता रूंदीकरण, समाजमंदिरे बांधणे, अद्ययावत मच्छीमार्केट बांधणे अशी नानाविध विकासकामे करण्यात आली. त्यामुळे प्रशासनाने स्मार्ट सिटी निवड प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. परंतु, सरकारने राज्यभरातून आलेल्या अनेक महानगरपालिकांचा या योजनेत समावेश केला. मात्र, वसई विरार महानगरपालिकेचा समावेश केला नाही. इतर महानगरपालिकेच्या तुलनेत सर्वाधिक विकासकामे या महानगरपालिकेच्या हद्दीत झाली असताना डावलण्यात आल्यामुळे करदात्या नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. याबाबत योग्य त्या स्तरावर लवकरच दाद मागितली जाणार आहे. (प्रतिनिधी)