शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

आदिवासींसाठी लढणारा योद्धा हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 05:18 IST

वाढवण बंदर, बुलेट ट्रेन आदी प्रकल्पांच्या विरोधात भाजपा सरकार विरोधातच अनेकदा दंड थोपटणारे खा. चिंतामण वनगा यांच्या निधनाने आदिवासींच्या हक्कासाठी लढणारा योद्धा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

पालघर : वाढवण बंदर, बुलेट ट्रेन आदी प्रकल्पांच्या विरोधात भाजपा सरकार विरोधातच अनेकदा दंड थोपटणारे खा. चिंतामण वनगा यांच्या निधनाने आदिवासींच्या हक्कासाठी लढणारा योद्धा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. वनगा यांनी भूमीपुत्रांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.तलासरी तालुक्यातील कवाडा या अत्यंत दुर्गम आदिवासीबहुल पाड्यावर १ जून १९५६ रोजी त्यांचा जन्म झाला. माजी खासदार व नायब राज्यपाल रामभाऊ कापसे, माधवराव काणे व प्रभाकर रेगे यांच्या तालमीत ते वाढले. त्यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. मुंबई विद्यापीठातून बीए व त्यानंतर त्यांनी एलएलबी पूर्ण केले. १९७९ पासून त्यांनी वकिली सुरू केली. अ‍ॅड. श्रीनिवास मोडक यांच्याकडून त्यांनी मार्गदर्शन घेतले. वकिली हा पेशा न ठेवता त्यांनी समाज बांधवांचे अनेक खटले मोफत लढविले. त्यांनी जव्हार, मोखाडा, विक्र मगड, वाडा, तलासरी, सिल्व्हासा येथील आदिवासींचे प्रश्न सोडविले. पुढे जव्हारला स्वत:चे कार्यालय स्थापून १९८० पासून स्वतंत्रपणे वकिलीला सुरूवात केली. त्यांनी ठाणे जिल्हा सत्र न्यायालय ते मुंबई उच्च न्यायालय अशी १९८० ते ९६ पर्यंत वकिली केली.खा. चिंतामण वनगा १९८२ ते ८४ भाजपचे जिल्हा चिटणीस तर १९८४ ते ८६ या काळात ते भाजपा युवा मोर्चाचे चे प्रदेश सचिव होते. १९८७ ते १९९० ते जव्हार तालुकाध्यक्ष होते. १९९५ पर्यंत ते भाजपाच्या आदिवासी आघाडीचे ते प्रदेशाध्यक्ष राहिले. पक्षाने त्यांना १९९७ साली भाजपाच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्त केले.दिल्लीत मान्यवरांनी घेतले अंत्यदर्शनडॉ. राममनोहर लोहिया रूग्णालयात वनगा यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. केंद्रीय परिवहन व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, महाराष्ट्राचे आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अंबरीशराजे अत्राम आदींनी श्रद्धांजली वाहिली.वनगा हे नि:स्पृह, निस्वार्थी आणि समर्पित कार्यकर्ते होते. आदिवासींच्या उत्थानासाठी त्यांनी आयुष्य समर्पित केले होते.- नितीन गडकरी,केंद्रीय परिवहन मंत्रीत्यांच्या निधनाने आदिवासी समाजाचे मोठे नुकसान झाले. आम्ही एकत्र काम करायचो. वनवासी कल्याण आश्रमाच्या शाळा त्यांनी सुरु केल्या.- प्रकाश जावडेकर, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री१९९६ पासून माझा त्यांचा परिचय आहे. साधे आणि मनमिळावू नेते होते. मतदारसंघात केलेल्या कामाची पावती म्हणूनच ते तीन वेळा लोकसभा निवडणूक जिंकले.- हंसराज अहिर, केंद्रीय गृहराज्य मंत्रींभाजपाने आदिवासी समाजाचा समर्पित सेवक आणि पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता गमावला आहे.- खा.रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजपा

टॅग्स :Chintaman Wangaचिंतामण वनगा