शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

नवघरमध्ये वारांगनांचा उच्छाद

By admin | Updated: January 8, 2016 01:53 IST

नवघर परिसरात वारांगनांचा सुळसुळाट झाला असून सकाळपासून रात्री उशिरापर्यंत वसई रोड रेल्वे स्टेशन, नवघर एसटी स्टँड आणि स्कायवॉकवर त्यांचा उपद्रव वाढतो आहे.

शशी करपे,वसईनवघर परिसरात वारांगनांचा सुळसुळाट झाला असून सकाळपासून रात्री उशिरापर्यंत वसई रोड रेल्वे स्टेशन, नवघर एसटी स्टँड आणि स्कायवॉकवर त्यांचा उपद्रव वाढतो आहे. यावर कारवाई करण्याऐवजी एसटी, रेल्वे आणि स्थानिक पोलीस एकमेकांकडे बोट दाखवून चालढकल करीत असल्याने त्यांनाही मॅनेज केले जात असल्याचे लोक उघडपणे बोलू लागले आहेत.नवघर-माणिकपूर शहरात अनेक लॉज आहेत. त्या लॉजमध्ये अनैतिक धंदे चालतात हे जगजाहिर आहे. मात्र, आता याठिकाणी येणाऱ्या वारांगनांनी रस्त्यावर उभे राहून गिऱ्हाईके पटवण्यास सुरुवात केली आणि गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत नेहमी गर्दीने भरलेल्या ठिकाणी वारांगनांचा जणू बाजारच भरू लागला आहे. वसई रोड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २, नवघर एसटी स्टँड आणि स्कायवॉक वर त्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर दिसतो. नवघर-माणिकपूर वसईतील सर्वांत जास्त लोकसंख्येचे शहर आहे. याठिकाणी शाळा-कॉलेज-क्लासेस खूप आहेत. नोकरीवर जाणाऱ्या महिला आणि गृहीणींची संख्या मोठी आहे. विद्यार्थींनी, कामावर जाणाऱ्या महिला आणि गृहिणींना ये-जा करण्यासाठी असलेल्या मुख्य रस्त्यावरच तीन-चारशे वारांगनांचा ठिय्या असतो. बाहेरख्यालींच्या नजरा महिलांना त्रास देतात. कधी तर या महिलांनाही विचारणा करण्यात येते. धक्कादायक बाब म्हणजे एसटी स्टँडमध्ये वीजेची पुरेशी सोय नसल्याने याठिकाणी रात्री काळोख असतो. त्याचाही फायदा घेतला जात असल्याने त्यातून मार्ग काढून ये-जा करणे महिलांना अतिशय जिकीरीचे होऊन बसते. त्यामुळे येथील महिला त्रस्त झाल्या आहेत. त्यानंतर गीता आयरे यांच्या माँ आणि श्रद्धा मोरे यांच्या स्त्री सखी महिला संघटनांनी अनेकवेळा आंदोलन करून वारांगनांना पिटाळून लावले आहे. पण, रेल्वे, एसटी आणि स्थानिक पोलीस कडक कारवाई करीत नाहीत.