शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मोफत गणवेशाची विद्यार्थ्यांना प्रतिक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 02:23 IST

सर्व शिक्षा अभियानांतर्गत २०१८/१९ या शैक्षणिक वर्षी इयत्ता पहिली ते आठवी शिकणाऱ्या अनुसुचित जाती-जमाती आणि द्रारिदय रेषेखालील विद्यार्थी-विद्यार्थीनींना मोफत गणवेश देण्याची योजना आहे.

विक्रमगड : सर्व शिक्षा अभियानांतर्गत २०१८/१९ या शैक्षणिक वर्षी इयत्ता पहिली ते आठवी शिकणाऱ्या अनुसुचित जाती-जमाती आणि द्रारिदय रेषेखालील विद्यार्थी-विद्यार्थीनींना मोफत गणवेश देण्याची योजना आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना दोन गणवेषासाठी ६०० रुपये दिले जाणार होते. ते त्याच्या खात्यात जमा होणार होते. परंतु विद्यार्थ्यांच्या बँक खात्याचा घोळ लक्षात घेऊन हे पैसे आता शाळा व्यवस्थापन समितीच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. परंतु ते अद्याप विद्यार्थ्यांच्या हाती पडलेले नाहीत.विक्रमगड तालुक्यात २३५ शाळा असून त्यातील १६ हजार ३०४ विद्यार्थ्यांचे एका गणवेशाचे तीनशे रुपये प्रमाणे ४८ लाख ९१ हजार २०० रुपये हे शाळाव्यवस्थापन समितीच्या खात्यात जमा झाले असले तरी या पैशातून प्रत्येक शाळा लगेचच गणवेश घेईलच असेल असे नाही कारण हे पैसे तीन ते चार दिवसापूर्वीच जमा झालेत त्यामुळे सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळालाच असेल असे नाही त्यामुळे उद्या होणाºया स्वातंत्र्य दिनाला विद्यार्थ्यांना आपला जुनाच गणवेश परिधान करावा लागणार आहे .हे पैसे एक आठवड्यापूर्वी मिळाले असते तर सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनी नविन गणवेश परिधान करता आला असता अशी प्रतिक्रि या कॉ. किरण गहला यांनी दिली आयत्यावेळी गणवेश कुठून आणणार? याबाबत गटविकास अधिकाºयांना विचारले असता पैसे ते उशीरा आले म्हणून समितीच्या खात्यावर पैसे उशीरा जमा झाले तरीही काही शाळानी उधारीवर गणवेश आणल्याचे सांगितले .विद्यार्थ्यांच्या हाती पैसे दिले तरी आदीवासी मातापिता त्यातून गणवेष घेतीलच याचीही कोणतीच शाश्वती नाही.पी. टी.चे ड्रेस आश्रमशाळेत पडूनपालघर : आदिवासी विकास विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला असून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू यांच्याकडील 33 शासकिय आश्रमशाळांकरीता सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात पी. टी. ड्रेसचा पुरवठा मार्च 2018 मध्ये करण्यात आला होता. मात्र त्याचे वाटप अद्याप न केल्यामुळे ते आश्रमशाळांत गेल्या 5 महिन्यांपासून धूळ खात पडलेले आहेत. त्याचे वाटप करणार तरी कधी? असा सवाल येथील पालक व विद्यार्थी करीत आहेत.डहाणू प्रकल्पातील एकूण 33 आश्रमशाळेतील जवळ जवळ 16 हजार विद्यार्थ्यांना स्पोर्टस् पी. टी. ड्रेसचा पुरवठा करण्याकरीता ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या, त्याची खरेदी थेट वर्षा अखेरीस म्हणजे मार्च 2018 या महिन्यात, करण्यात आली. त्याचा मार्च 2018 मध्ये आश्रमशाळांना पुरवठाही करण्यात आला, मात्र ते 2018-19 या शैक्षणिक वर्षात वाटप करण्याबाबत कार्यालयाकडून मौखिक रुपात सांगण्यात आले. मात्र त्याचे अद्याप वाटप करण्यात आले नसल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. सन 2017-18 च्या खरेदीचे ड्रेस सन 2018-19 मध्ये का वाटप केले जात आहेत ? तसेच ड्रेस वाटप करण्यात इतका विलंब का होत आहे ? ड्रेस वेळेवर का वाटप केले जात नाहीत? याबाबत अद्याप कुठलाच खुलासा नाही.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या