शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जव्हार, मोखाड्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या यादीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:28 IST

पालकमंत्र्यांनी शेतक-यांच्या बांधावर जाऊन पीक परिस्थितीची पाहणी केल्यानंतर शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; परंतु अद्यापही जव्हार मोखाडा हे आदिवासी तालुके दुष्काळाच्या यादीत समाविष्ट झाले नसल्याने शेतक-यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

- रविंद्र साळवेमोखाडा : जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजा दुष्काळामुळे मेटाकुटीला आला आहे अडिच महिने पावसाने ओढ दिल्याने जव्हार मोखाड्यात विदारक परिस्थिती निर्माण झाली असतानादेखील आणेवारी जास्त दाखवल्याने दुष्काळाच्या यादीतून ‘जव्हार-मोखाडा’ हे कुपोषणाने पीडित असलेले तालुके डावलले. दुष्काळाच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी शेतकºयांना आता आत्महत्या कराव्या लागणार का, असा संतप्त सवाल आता जव्हार मोखाड्यातील शेतकºयांकडून उपस्थित होत आहे.पालकमंत्र्यांनी शेतक-यांच्या बांधावर जाऊन पीक परिस्थितीची पाहणी केल्यानंतर शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; परंतु अद्यापही जव्हार मोखाडा हे आदिवासी तालुके दुष्काळाच्या यादीत समाविष्ट झाले नसल्याने शेतक-यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.सप्टेंबर महिन्यातील कडक उन्हामुळे जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये बहुतांश उभे पीक करपून गेले. भात, नागली आणि वरई या पिकांवर करपा, तांब्या आणि बगळ्या रोगांचा प्रार्दुभाव वाढला. वाढत्या तापमानात भातावरील विविध रोगांचा प्रसार होऊन भात पीक तयार होण्याची प्रक्रिया सुरू असताना पावसाने हुलकावणी दिल्याने आवश्यक पाणी शेतीला मिळाले नाही. त्यामुळे पिकाऐवजी गवताची पेंढी हाती आल्याने अनेक ठिकाणी शेतकºयांवर उभे भात पीक पेटवून देण्याची नामुष्की ओढवली.यंदा सुरूवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने सुमारे ९५ टक्के भाताची रोवणी करण्यात आली; परंतु पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली भात शेती पावसाअभावी धोक्यात आली. त्यामुळे अनेक विघ्नांवर मात करीत केली जाणारी पारंपरिक शेती पुढे करायची का नाही, असा प्रश्न उभा ठाकला असताना दुष्काळाच्या यादीतून जव्हार मोखाडा हे तालुके वगळून सरकारने शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.शेतकºयांची थट्टापेरणी, पाऊस, भूजल पातळी, उत्पादन आदीच्या सॅटेलाईटद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी १७२ तालुक्यांवर दुष्काळाचे सावट असल्याची घोषणा करण्यात आली. केंद्र सरकारच्या नवीन निकषानुसार पालघर, विक्र मगड आणि तलासरी हे तीन दुष्काळाची झळ लागलेले तालुके घोषित करण्यात आले. प्रत्यक्षात संपूर्ण पालघर जिल्ह्यातील खरीप हंगाम हा पावसावर अवलंबून असताना सॅटेलाईटद्वारे केलेला सर्व्हे जव्हार मोखाड्यातील शेतकºयांना बाधक ठरला असून पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर येथील आदिवासी शेतकरी डोळ्यात तेल घालून दुष्काळ यादीची वाट पाहत आहेत.जव्हार मोखाड्यातील पिकांची परिस्थिती गंभीर असून दुष्काळाबाबत सरकार संवेदनशील आहे. १५ डिसेंबरनंतर दुष्काळाची यादी प्रसिद्ध होणार असून, मंडळनिहाय दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता आहे-विष्णू सवरा, पालकमंत्री पालघर जिल्हायावर्षी कोणतेच पीक हाताला लागले नाही. आमची शेती पाण्याअभावी पूर्ण करपून गेली. त्यामुळे सरकारने आमचा तालुका दुष्काळ यादीत समाविष्ट करून मदत जाहीर करावी.-शिवाजी गवळी, शेतकरीधामणशेत -कोशिमशेत ग्रामपंचायत

टॅग्स :Vasai Virarवसई विरार