शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

ढिसाळ नियोजनामुळे वाडेकरांचा श्वास कोंडतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 03:44 IST

वाडा शहर झपाट्याने नागरीकरणाकडे विस्तारत असताना नागरी सुविधा पुरविण्यात ग्रामपंचायत अपयशी ठरली आहे. नागरिकांना स्वच्छतेचा प्रश्न अधिक भेडसावतोय.

वसंत भोईर वाडा : वाडा शहर झपाट्याने नागरीकरणाकडे विस्तारत असताना नागरी सुविधा पुरविण्यात ग्रामपंचायत अपयशी ठरली आहे. नागरिकांना स्वच्छतेचा प्रश्न अधिक भेडसावतोय. शहराच्या मध्यवर्ती भागात जागोजागी कचरा साचल्याने नागरिकांना नाक मुठीत घेऊन चालावे लागतेय. सत्ताधाºयांच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांचा जणू श्वासच कोंडतोय अशी परिस्थिती ओढवली आहे.शहर वाढू लागल्याने कचरा निर्माण होण्याचं प्रमाण वाढू लागलं. हा संपूर्ण कचरा उचलून शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु यंत्रणा व मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने सकाळी कचरा उचलल्यनंतर पुन्हा काही तासात तसेच कचर्याचे ढिग निर्माण होतात. मार्केट परिसरात तर बकाल स्थिती बनली आहे. भाजीपाल्यापासून निर्माण होणाºया कचरा कुजल्याने प्रचंड दुर्गंधीचा सामना नागरिकांना करावा लागतो. रस्त्यावर मोकाट जनावरे कायम तळ ठोकून असल्याने या रस्त्याने चालत जाणे म्हणजे जीवावर बेतणारे आहे. या जनावरांमुळे येथून वाहने चालवणेही दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनले आहे. मुख्य रस्त्यावर वाचनालयालगत कचरा कायम असतो. तहसीलकडे जाणाºया रस्त्यावर साठलेल्या कचºयावर जनावरे कायम असल्याने वाहतूक कोंडी कायम होत असते. मुख्य बजारपेठेत निर्माण होणारा कचरा साठू नये यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे या कचºयावर पोसल्या जाणाºया मोकाट जनावरांमुळे अनेकांच्या जीवावर बेतले. गेली दहा वर्ष सत्तेत असलेल्या शिवसेना- भाजपच्या पदाधिकाºयांना स्वच्छतेच्या बाबत गांभीर्याने उपाययोजना करण्याची बुद्धी सूचली नाही. शहरातून कचरा उचलायचा आणि गावाच्या वेशीवर टाकायचा यापलीकडे यांची स्वच्छतेची मोहीम गेली नाही.स्वच्छता अभियानात हातात झाडू घेऊन मिरवणारे सरपंच - उपसरपंच प्रत्यक्ष गावाच्या स्वच्छतेच्या, मल:निस्सारणाच्या बाबतीत व कचरा व्यवस्थापनाबाबत कधी गंभीर राहिले नाहीत. डंपींग ग्राउंडच्या समस्येबाबत काही प्रयत्न झाले नाहीत. शहराच्या प्रवेशद्वारावरच डंपींग निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रचंड दुर्गंधीचा सामना करत लोकांना नाक मुठीत धरूनच येथून जावे लागतेय. तर कचºयाला लागलेल्या आगीमुळे प्रचंड धुराचे लोळ निर्माण झाल्याने अपघाताचा धोका संभवतोय. त्यामुळे कचºयाची समस्या एवढी गंभीर असताना पदाधिकाºयांनी मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने दिवसागणिक ही समस्या वाढू लागली आहे. ज्या कर्मचाºयांच्या जीवावर शहराची स्वच्छता अवलंबून आहे, त्या सफाई कर्मचाºयांना कोणत्याही सोयीसुविधा नाहीत.