शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाडा कॉलेजमध्ये आले तरुणाईला उधाण

By admin | Updated: January 23, 2017 05:06 IST

या शहरातील कॉलेज आॅफ मॅनेजमेंट या कॉलेजमध्ये दोन दिवसीय उधाण यूथ फेस्टिव्हलचे आयोजन केले असून त्यात क्रीडा

वाडा : या शहरातील कॉलेज आॅफ मॅनेजमेंट या कॉलेजमध्ये दोन दिवसीय उधाण यूथ फेस्टिव्हलचे आयोजन केले असून त्यात क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांची लयलूट आहे. वाडा तालुक्यासह शहापूर, भिवंडी, जव्हार, मोखाडा, विक्रमगड अश्या अनेक तालुक्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी या कॉलेजात विविध प्रकारचे शिक्षण घेण्यासाठी येत असतात. या कॉलेजमध्ये दरवर्षी प्रमाणे या वर्षीही उधाण २०१७ हे यूथ फेस्टिव्हल शुक्र वारपासून सुरु झाले आहे.या कार्यक्र याच्या उदघाटन प्रसंगी खेळ हा मैदाना पुरता मर्यादित नसून तो एकमेकांत सांघिक नातं तयार करतो.खेळाने आरोग्य तर सुंदर होतेच परंतु लिंगभेद व जातीयत्येच्या भिंती नष्ट होतात, असे मतं जेष्ठ पत्रकार रमाकांत पाटील यांनी व्यक्त केले.आपापल्या कलागुणांना जोपासा व खूप आनंद लुटा, डोळ्यासमोर चांगल्या लोकांचा आदर्श ठेवा असा कानमंत्र युवा सामाजिक कार्यकर्त्या निशा सवरा यांनी विद्यार्थ्यांना दिला. मुलांच्या उत्साहाला कायम उधाण येण्यासाठी असे फेस्टिव्हल साजरे होणे आवश्यक असून वाडा हा आता ग्रामीण राहिला नसून शहरी झाला आहे. सोशल मिडिया हे हत्यार असून त्याचा योग्य वापर करा, हल्ली माणसं जोडणे महत्वाचं काम असून खेळ माणसांना जोडतो असे मोलाचे मार्गदर्शन सामाजिक कार्यकर्ते विवेक पंडित यांनी व्यक्त केले. वाडा गटविकास अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे, संदीप पवार, शरद पाटील यांच्यासह अनेक राजकीय नेते,कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या मेहनतीने तयारी केली असून दोन दिवस विविध कार्यक्र म साजरे झाले. (वार्ताहर)