शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

२९५ ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान

By admin | Updated: April 18, 2016 00:32 IST

पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ३१५ ग्रामपंचायती पैकी २९५ ग्रामपंचायतींसाठी आज शांततापूर्वक भरघोस मतदान झाले असून २ हजार ६४० उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले

पालघर : पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ३१५ ग्रामपंचायती पैकी २९५ ग्रामपंचायतींसाठी आज शांततापूर्वक भरघोस मतदान झाले असून २ हजार ६४० उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. १ हजार ५६ मतदान केंद्रांवर ७ हजार १०१ ईव्हिएम मशिन्सद्वारे हे मतदान पार पडले असून ही यंत्रे सीलबंद करून मतमोजणी केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्तामध्ये रवाना करण्यात आली आहेत.संपूर्ण जिल्ह्यात ७० ते ८० टक्के दरम्यान मतदान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून मतदान केंद्रे दुर्गम भागात असल्याने निश्चित आकडेवारी कळण्यास मध्यरात्र होईल असेही त्यांनी सांगितले. सर्वत्र शांततेत मतदान पार पडलेले असतांना वाडा तालुक्यात मात्र पंचायत समितीचे माजी उपसभापती कुणबी सेनेचे प्रफुल्ल पाटील यांना विरोधकांनी बेदम मारहाण करण्याची व त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागण्याची घटना देवघर गावी घडली. तर पालसई या गावी भाजपाचे कार्यकर्ते पंढरीनाथ पाटील यांना मारहाण झाली. पालघर तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान मनोरजवळील वाडाखडकोना या भागात तुरळक बाचाबाचीचे प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी ७० ते ८० टक्के मतदान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मोखाड्यात २८ ग्रामपंचायतींसाठी ७२.०८ टक्के मतदान झाले आहे. तर वसई तालुक्यात ११ ग्रामपंचायतींसाठी ८२ टक्के मतदान झाले आहे. तलासरी तालुक्यात ६८.६७ टक्के मतदान झाले आहे. जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ५७.५५ टक्के मतदान झाले होते.वाडा ७० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मतदरांनी उत्साहपूर्ण वातावरणात मतदान केल्याने वाडा तालुक्यात सरासरी ८० टक्के मतदान झाले. तुरळक प्रकार वगळता तालुक्यात मतदान शांततेत पार पडले. मोखाडा तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या २१९ जागांसाठी ७२.०८ टक्के मतदान झाले आहे. डहाणू तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींपैकीे आसवे ,दाभले आणि चिंबावे या बिनविरोध झाल्या आहेत .तर चंडीगाव ग्रामपंचायतीसाठी अर्ज दाखल नसल्याने ६२ पैकी प्रत्यक्षात ५८ ग्रामपंचायतीसाठी आज मतदान झाले आहे . वसई तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींसाठी ८२ टक्के मतदान झाले. बंदोबस्त कडेकोट आधी मतदान मग लगीनअप्पर पोलीस अधिक्षकांसह ६ उपविभागीय पोलीस अधिकारी, १० पोलीस निरीक्षक, १४३ सहा. पो. नि. व पोलीस उपनिरीक्षक, १ हजार ४०० पोलीस कर्मचारी, ३०० होमगार्ड, असा बंदोबस्त तैनात होता.१०५६ मतदान केंद्रांवर ७ हजार १०१ मतदान यंत्राद्वारे हे मतदान पार पाडले गेले.टेणसारख्या ग्रामपंचायतीने बिनविरोध निवडणूक घडवली होती. तर विक्रमगड ग्रामपंचायतीने नगर पंचायती व्हावी यासाठी निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. त्यामुळे तिथे निवडणूक झाली नाही. तालुक्यातील घोणसई गावातील एक तर गावातील दोन नवरदेवांनी मंडपातून थेट मतदान केंद्रात जाऊन नवा आदर्श घातला.लग्नतिथी जोरदार असल्यामुळे हळदीने माखलेल्या नवरींनीही व वऱ्हाडींनी आधी मतदान मग लगीन असाच प्रकार केला.तसेच निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गोवार यांना उष्माघाताचा झटका येण्याचेही घटना घडली.काही ठिकाणी तर उमेदवार आणि समर्थक लग्नाच्या ठिकाणीच वाहने घेऊन सज्ज होते. वऱ्हाडी मंडळींमध्ये मतदान दिसताच त्यांना या वाहनातून मतदान केंद्रांपर्यंत नेले जात होते. टाळी लागली आता मतदानाला चला, पंगतीला बसण्याचा आग्रह धरू नका, असे ही मंडळी म्हणत होती.