शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

तापमान तपासूनच करावे लागणार मतदान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 01:01 IST

केंद्रांमध्ये विशेष व्यवस्था : मास्कमुळे मतदारांची ओळख पटवण्यात अडचणी

सुनील घरत लोकमत न्यूज नेटवर्कपारोळ :  पालघर जिल्ह्यात सत्पाळा, पाली व सांगावे या तीन ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होत आहे. यंदाची निवडणूक कोरोना महामारीत होत असल्याने मतदान केंद्रांमध्ये येणाऱ्या प्रत्येक मतदाराचे तापमान तपासले जाणार असून त्यानंतरच संबंधिताला मतदान करता येणार आहे. काेराेनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मतदारांना स्वत:ची काळजी घेऊनच मतदान करावे लागणार आहे. मतदान करताना मतदारांमध्ये सोशल डिस्टन्स राखण्यासाठी केंद्रामध्ये विशेष व्यवस्था करावी लागणार आहे.

वसई  तालुक्यात होत असलेल्या या निवडणुकीत सत्पाळामध्ये ९०१ मतदार आहेत. त्यामध्ये ४७० पुरुष, तर ४३१ महिला असून ११ जागांसाठी या ठिकाणी मतदान होणार आहे. तसेच पाली ग्रामपंचायतीत चार जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत ६२३ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात ३१४ पुरुष, तर २०९ महिला मतदार आहेत. तीन उमेदवार बिनविरोध आल्याने चार जागांसाठी निवडणूक होणार आहे. 

मतदान केंद्रांवर ओळख कशी पटणार?

तोंडावर मास्क असल्याने मतदारांची मतदान केंद्रावर ओळख कशी पटणार, हाही या ग्रामपंचायत निवडणुकीतील मोठा प्रश्न आहे. मतदान केंद्रावर ओळखपत्र घेऊन जाणे व ओळख पटवून मतदान करणे हे अनिवार्य आहे. यासाठी आता निवडणूक आयोगाने विशेष ओळखपत्राची व्यवस्था केली आहे. मतदार यादीतही मतदाराच्या फाेटोचा समावेश आहे. पण आता ही निवडणूक कोरोनाकाळात हाेत असल्याने मतदारांना मास्क अनिवार्य केले आहे.

वसई ग्रामीणमधील कोरोनास्थितीस्वॅब १२,४४१, निगेटिव्ह १०,८६७, पॉझिटिव्ह १,३६६, मृत्यू ४९. आताचे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ४. वसईत कोरोना प्रादुर्भावाचे प्रमाण कमी असले तरी धोका कायम आहे. यासाठी निवडणूक आयोगाला मतदानाच्या वेळी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

कोरोनाकाळात होत असलेली निवडणूक नियम व अटी पाळून पार पाडावी लागत असल्याने त्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. मात्र वसई तालुक्यात कोरोनाचे सर्व नियम, अटी पाळून सत्पाळा व पाली या ग्रामपंचायतींमध्ये १५ जानेवारीला मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाने सर्व व्यवस्था केली आहे.         - उज्ज्वला भगत, तहसीलदार वसई

मतदानासाठी प्रशासनाने केलेली तयारी व नियम कोरोनाकाळात निवडणूक होत असल्याने काही नियम पाळून मतदान करावे लागणार आहे. निवडणुकीदरम्यान मास्क वापरावा.  मतदान केंद्रामध्ये येणाऱ्या मतदारांचे थर्मल स्कॅनिंग केले जावे.  मतदान केंद्राच्या ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था करावी.  मतदान केंद्रे मोठ्या खोल्यांमध्ये घ्यावीत. मतदानाच्या ठिकणी मतदारांमध्ये सोशल डिस्टन्स असावे, आदी नियम प्रशासनाने आखून दिले आहेत. 

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार