शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

मतदारयाद्या होणार १६ फेब्रुवारीला प्रसिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 01:55 IST

वसई पालिका निवडणुकीची तयारी सुरू

वसई : मागील वर्षभरापासून लोकप्रतिनिधीविना व प्रशासक म्हणून नियुक्त असलेल्या वसई-विरार शहर महापालिकेची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया आता खऱ्या अर्थी सुरू झाली आहे. येत्या दि. १६ फेब्रुवारीला पालिका प्रशासन विभागांतील मतदार याद्या प्रसिद्ध करणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.गतवर्षी दि. १३ मार्चला वसईत कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केले आणि सर्वच कामकाज ठप्प झाले. महापालिका तसेच लोकप्रतिनिधीचा कार्यकाळ दि. २८ जून २०२० रोजी संपुष्टात आला आणि महापालिकेत नवे आयुक्त हेच प्रशासक म्हणून कारभार बघू लागले.परिणामी, दि. २८ जूनच्या रात्रीपासून आयुक्त गंगाथरन डी. हे आयुक्त व प्रशासक असा दुहेरी कारभार हाकत आहेत. गेल्या नऊ महिन्यांपासून महापालिका निवडणुकीची लोकप्रतिनिधी आणि नागरिकही अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. तर प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचता येत नसल्यामुळे व पालिकेत आलेले बहुतेक नवीन अधिकारी माजी नगरसेवकांनाही दाद देत नसल्यामुळे नागरिक आपला लोकप्रतिनिधी निवडून येण्याची वाट पाहत आहेत.गेल्या ९ महिन्यांपासून पालिकेतील प्रशासकीय कामे, नाले साफसफाई, रस्त्यावरील फेरीवाल्यांचे, पार्किंगचे अतिक्रमण, बेकायदा बांधकामे वाढत चालली आहेत. विविध दाखले, थकीत पाणीपट्टीसाठी, घरपट्टीसाठी मुदतवाढ अशा अनेक समस्यांमध्ये नागरिकांना लोकप्रतिनिधींची गरज भासू लागली आहे. तर राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या निर्देशानुसार त्यांची प्रतीक्षा आता संपत आल्याचे महापालिकेने सुरू केलेल्या निवडणुकीच्या हालचालीवरून दिसून आले आहे.निवडणूक कामकाजाचे अधिकाऱ्यांना वाटप महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त गंगाथरन यांनी विविध कामांसाठी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. डॉ. किशोर गवस यांची नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रभागनिहाय उपायुक्त्यांच्याही नेमणुका करण्यात आल्या आहेत. यात प्रदीप जांभळे-पाटील, नयना ससाणे, पंकज पाटील, शंकर खंदारे, दीपक कुरळेकर, विजयकुमार द्वासे, तानाजी नराळे, चारुशीला पंडित यांची अनुक्रमे ‘ए’ ते ‘आय’ प्रभाग समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने आपापल्या प्रभागातील निवडणूकविषयक सर्व पूर्वतयारी आणि कामकाजाची जबाबदारी संबंधित उपायुक्तांवर सोपविण्यात आली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार