वसई : विरार येथील विवा महाविद्यालयाच्या कॉमर्स विभागातर्फे ’कॉम क्यू’ या आंतरमहाविद्यालयात आयोजिलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विवा महाविद्यालयाच्या टीम्सनी पटकावला. विजेत्यांना ट्रॉफी आणि रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आले. यात सहा महाविद्यालयाच्या २१ संघांनी भाग घेतला होता. गणित, अर्थशास्त्र आणि अकाउंटस् विषयासंदर्भात विविध प्रश्न या स्पर्धेत विचारण्यात आले होते. परीक्षक म्हणून शंकर नारायण महाविद्यालयाच्या अकाउंटस् विभागाच्या डॉ. अनुपमा गावडे यांच्याबरोबर प्रा. मनोज कुरुप, प्रा. फिरोज खान आणि प्रा. मनिष पिठाडिया यांनी काम बघितले. प्रत्येक टीममध्ये २ विद्यार्थ्यांचा सहभाग होता. तीन फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. या वेळी विचारलेले प्रश्न अनेकांची फिरकी घेत होते.सूत्रसंचालन नुमान खातीब याने केले. उद्घाटनाला प्राचार्य डॉ. रविकिरण भगत, उपप्राचार्या प्राजक्ता परांजपे, कॉमर्स विभागाच्या प्रमुख प्रा. राखी ओझा, अकांऊटंसी विभागाचे प्रमुख सूरज वाधवा उपस्थित होते.ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वेरोनिका बारला, दीपक गुप्ता, कौशिक सावे यांच्या नेतृत्वाखाली सोनल राऊत, विश्वनाथ पवार, स्रेहल पाटील, रोहन साटम, स्रेहल शिर्के, विशाखा संपत, अर्जुन विश्वकर्मा, चेतन वर्मा, स्मिता जाधव, रीना बेहेरा, परवीन खान, प्रदीप वर्मा, मधू शर्मा, प्रफुल्ल घाग, ग्लोरिटा परेरा, सचिन कदम या शिक्षकांनी मेहनत घेतली. (प्रतिनिधी)
प्रश्नमंजुषा स्पर्धेत विवाची हॅट्ट्रिक
By admin | Updated: February 14, 2017 02:33 IST