शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

विरारच्या तलाठी कार्यालयाचा लवकरच होणार कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 01:12 IST

बांधकाम आले मोडकळीस; महसूलमंत्र्यांनी कारवाईचे दिले आदेश

वसई : विरार पूर्व भागात मागील अनेक वर्षांपासून तलाठी सजा विरार कार्यालय हे कार्यरत असून, हे कार्यालयच आता मोडकळीस आले आहे. वसईतील बहुतांश तलाठी कार्यालयांची दुरवस्था पाहिल्यानंतर, वसई-विरार येथील काँग्रेसचे अध्यक्ष कुलदीप वर्तक यांनी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची महसूलमंत्र्यांनी तातडीने दखल घेऊन महसूल विभागाच्या उपसचिवांना ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या या कार्यालयाचा कायापालट होण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे.विरार स्थित या तलाठी कार्यालयांतर्गत चंदनसार, चिखल डोंगरे, नारंगी, विरार पूर्व व पश्चिम, दहिसर परिसर येत असून, येथील नागरिकांची जागेच्या संदर्भातील उतारे, फेरफार, गाव नमुना, उत्पन्नाचे दाखले, तलाठी रिपोर्ट इ. कामे या तलाठी कार्यालयामार्फत होतात, तर मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या कार्यालयात दररोज लोकं मोठ्या संख्येने येतात. मात्र, या कार्यालयाची गेल्या काही वर्षांपासून दुरवस्था झालेली होती. त्याच्या दुरुस्तीकडे कोणीही लक्ष देत नव्हते आणि अशाच दुरवस्था झालेल्या कार्यालयात अधिकारी-कर्मचारी जिवावर उदार होऊन काम करत आहेत, तसेच महसूलच्या कामासाठी येणाऱ्या नागरिकांनाही भीती असते. या कार्यालयात जाण्यासाठी असलेले प्रवेशद्वार उंचीने कमी असून, नागरिकांना वाकूनच आत जावे लागते. या कार्यालयाची अवस्था धोकादायक असल्याने एखादी दुर्घटना घडली, तर जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. या कार्यालयामार्फत प्रशासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असूनही या कार्यालयाची दुरुस्ती का होत नाही, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. काही नागरिकांनी याबाबत महसूल खात्याकडे तक्रारही केली होती. पावसाळ्यात ताडपत्रीचा आधारदरवर्षी पावसाळ्यात परिस्थिती बिकट होते. छपरातून पाणी गळती होत असल्याने, कार्यालयातील दस्तऐवज, शासकीय कागदपत्रे जपून ठेवण्यासाठी कर्मचारी, शिपाई वर्ग यांना ताडपत्रीचा आधार घ्यावा लागतो. या आणि वसई तालुक्यातील इतर कार्यालयांची नेमकी परिस्थिती व दुरवस्था जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी पाहून निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. आता महसूलमंत्र्यांनी महसूल विभागाच्या उपसचिवांना याबाबत ताबडतोब कारवाईचे आदेश दिल्याने, या कार्यालयाचा कायापालट कधी होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.