शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

अलोंड्यातील मांत्रिकाविरोधात ग्रामस्थ पोलिसांत

By admin | Updated: August 9, 2015 23:07 IST

आलोंडे (वडपाडा) येथे अंधश्रद्धा पसरवून भूतबाधा व असाध्य रोगावर उपचार केल्याचा दावा करून गावात अशांतता पसरविणारा भोंदू मांत्रिक किसन रामा लहांगे व त्याच्या साथीदारांवर

हितेन नाईक, पालघरआलोंडे (वडपाडा) येथे अंधश्रद्धा पसरवून भूतबाधा व असाध्य रोगावर उपचार केल्याचा दावा करून गावात अशांतता पसरविणारा भोंदू मांत्रिक किसन रामा लहांगे व त्याच्या साथीदारांवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी विक्रमगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.वाडा तालुक्यातील असनस, कळंभई या गावांतील किसन रामा लहांगे (बाबा) आणि त्याच्या पत्नीने आलोंडे (वडपाडा) गावाबाहेर एक झोपडी बांधून बुवाबाजीचे दुकान थाटले आहे. त्यांनी गावातील विजय रुपजी दळवी, बच्चू रुपजी दळवी, विनोद रुपजी दळवी, सुरेश रुपजी दळवी इ. पाड्यातील लोकांना हाताशी धरून लोकांमध्ये अंधश्रद्धा निर्माण करून मनात भीती निर्माण करून पैसे उकळण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे स्थानिकांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. किसन लहांगे हे मंत्रतंत्राद्वारे भूतपिशाच्चांनाही आवाहन केल्याचा आभास निर्माण करून अघोरी कृत्ये करण्यास भाग पाडून अनेक आजार व घरातील भूतपिशाच्चांचा बंदोबस्त करण्याचा दावा करीत असल्याचे अलोंडे येथील रहिवासी सुरेश पा. कोती यांनी लोकमतला सांगितले. त्यामुळे महाराष्ट्र अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक व उच्चाटन कायदा २०१३ च्या कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांचे बुवाबाजीचे दुकान बंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. विक्रमगड तालुक्यातील साखरे येथील ग्रामस्थांनी जादूटोणा करणाऱ्या भोंदूबाबांचे दुकान बंद केल्यानंतर अशा समाजविघातक प्रवृत्तीच्या विरोधात आदिवासी समाज उठाव करू लागला आहे.