शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक सोयी नसलेले गाव

By admin | Updated: May 15, 2016 01:12 IST

राहायला पक्के घर नाही, प्यायला स्वच्छ पाणी नाही आणि पोटाला अन्न नाही, अशी अवस्था असलेल्या गावात सरकारने १४.७५ लाख रुपये मोजून समाजभवन उभारले आहे.

हितेन नाईक, पालघरराहायला पक्के घर नाही, प्यायला स्वच्छ पाणी नाही आणि पोटाला अन्न नाही, अशी अवस्था असलेल्या गावात सरकारने १४.७५ लाख रुपये मोजून समाजभवन उभारले आहे. गोरगरिबांना चिडवणारे हे चित्र आहे, खोडाळ्यातील कातकरीपाड्याचे. या गावात आदिवासी-कातकरी समाजाची इनमीन ५० घरे असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी गावातील सर्व पुरुष मंडळी शहराकडे असतात.पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी मोखाडा, जव्हार, विक्रमगड या तालुक्यांत ९५ टक्के आदिवासी लोकवस्ती आहे. आदिवासींना केंद्रबिंदू मानून नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली असताना जवळपास दोन वर्षांचा कालावधी लोटला असताना सर्वसामान्यांचे अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्न सुटण्यास सुरुवात झाली आहे काय, हे पाहिल्यास नाही, असे काहीसे खेदाने म्हणावे लागेल. असे चित्र मोखाडा-खोडाळामधील ग्रामीण भागात दिसून आले.खोडाळा येथील कातकरीपाड्यातील झोपड्यांमध्ये राहणारे कातकरी समाजबांधव आजही जगण्याचा संषर्घ करीत आहेत. प्रत्येक घरातील कुटुंबप्रमुख व त्याची पत्नी आपल्या मुलांना म्हाताऱ्या आईवडिलांकडे सोपवून रोजगाराच्या शोधार्थ भिवंडी, वाडा, ठाणे, पालघर इ. भागांत ४ ते ५ महिने राहतात. त्यामुळे त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे. येथील अंगणवाडी नावाला असल्याचे दिसून येते. पिण्याचे पाणी स्वच्छतेच्या कसोटीवर नापास असून आरोग्याच्या सुविधांचा अभावही येथे प्रकर्षाने जाणवतो. या पाड्यातील ८० टक्के घरे ही चंद्रमौळी झोपड्या असल्याने त्यांच्या गरिबीची साक्ष देत असल्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना जीवनोपयोगी सुविधा देणे गरजेचे असताना आदिवासी विकास विभागाच्या ठक्कर बाप्पा योजनेतून १४ लाख ७५ हजारांचे समाजभवन उभारण्यात आले. जे या पाड्यातील नागरिकांच्या काही उपयोगाचे नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासन आदिवासी समाजाच्या विकासासाठी नियोजित केलेल्या निधीचा योग्य विनियोग करीत नसल्याचे दिसून येत आहे.