शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडचा गावठी कोलम (झिनी), तांदूळ नामशेष होणार?

By admin | Updated: July 14, 2016 01:33 IST

कमी कालावधीत प्रसिध्द पावलेला व खाण्यास रुचकर व मागणी जास्त असलेला गावठी कोलम (झिनी) तांदळचे उत्पादन पूर्वी प्रमाणे होत नसल्याने त्यांचे उत्पादन दिवसेंदिवस घटत चाललेले आ

राहुल वाडेकर,  विक्रमगडकमी कालावधीत प्रसिध्द पावलेला व खाण्यास रुचकर व मागणी जास्त असलेला गावठी कोलम (झिनी) तांदळचे उत्पादन पूर्वी प्रमाणे होत नसल्याने त्यांचे उत्पादन दिवसेंदिवस घटत चाललेले आहे़ हा तांदूळ सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे़ कारण त्याला मिळणारा कमी भाव, मजुरीचे वाढते दर, शेती साहित्याच्या वाढलेल्या किंमती, महागाई व निसर्गाचा लहरीपणा आहे. विक्रमगड तालुक्यातील घेतल्या जाणाऱ्या या रुचकर गावठी लहान दाण्याच्या भातपिकाचे उत्पादन दिवसेंदिवस कमी होत आहे़ शेतकरी सध्या या पिकाकडे दुर्लक्ष करीत असुन त्यामूळे एक चांगले भातपीक धोक्यात आले आहे़ सध्या हा तांदुळ बाजारात ५५ ते ५६ रुपये किलो दराने विकला जात आहे़तरुणाई शेती उत्पादनाबाबत उदासिन धोरणराबाबत आहे़ काही ठिकाणी नवनवीन सुधारीत जातीच्या वाणांची लागवड केली जात असल्याने या कोलम तांदळाचे उत्पादन घटले आहे़ त्याच्या उत्पादनासाठी मोठी मेहनत घ्यावी लागतेच व खर्चही बराच करावा लागतो़ हया तांदळाचा दाना लहान व गोडीस असल्याने निसर्गाने साथ दिली तर ठिक नाही तर नुकसान सहन करावे लागते़ कारण गोड तांदुळास कीड लवकर लागते व त्यापासून खुप जपावे लागते, मेहनत घ्यावी लागते़ त्यामुळे या भात पिकाला पूर्वीचे गत वैभव प्राप्त होण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे मत विक्रमगड येथील शेतकरी निलेश सांबरे यांनी लोकमतकडे व्यक्त केले.विक्रमगड तालुक्यातील मृदा,पावसाचे प्रमाण व अनुकूल हवामान पाहता साधारण अडीच दशकांपूर्वी विक्रमगड कोलमचे मोठया प्रमाणात उत्पादन घेतले जात होते.एक सेंटीमिटर लांबीचा दाणा व सुगंध यामुळे हा खाण्यासाठी रुचकर म्हणून प्रसिध्द होता. याची सर्वत्र मोठी मागणी आहे़ विक्रमगडच्या मातीत हे रुचकर पीक तयार होत असल्याने या पिकाने आपले स्थान पक्के केले होते़ परंतु कालांतराने शेतकरीही आधुनिक युगातील नवीन व जादा उत्पादन देणाऱ्या भात पिकांकडे वळल्याने जास्त मेहनत व खर्चीक असलेल्या कोलमचे उत्पादन घेण्यास उदासीन झाला आहे़पूर्वी भात पिकाच्या मोजक्या जाती होत्या त्यात कोलम तांदळाला चांगला बाजारभाव मिळत असे़ त्यामुळे या भात पिकाची कोठारे तालुक्यातील विविध भागातील आदिवासी व कुणबी शेतकरी कणग्यांमध्ये भरुन ठेवत असे आणि त्या कणग्यांना शेणाने सावरुन सुरक्षित पॅकींग करुन बंद करुन भरुन ठेवत असायचे़ मात्र अलिकडे भातपिकांच्या संकरित व सुधारित जातीमुळे हे कष्टाळू भातपीक दुर्लक्षित होउ लागले आहे़ पूर्वीच्या जमान्यात आताची महागाई व येणारा खर्च जाउन बाजार भावही योग्य मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी हे पीक घेण्याकडे पाठ फिरवली आहे. तालुक्यातील केवळ श्रीमंत शेतकरी व अपवाद वगळता काही मोजकेच शेतकरी हे दर्जेदार पीक घरी खाण्याकरिता घेत आहेत.