शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गाव, पाडा मुख्य रस्त्याला जोडणार!

By admin | Updated: June 28, 2016 03:12 IST

गांवे मुख्य रस्त्याला जोडण्याचे काम सुरु केले असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्हयाचे पालक मंत्री विष्णू सवरा यांनी रविवारी(२६ जून) पीक येथे केले.

वाडा : येत्या दोन वर्षात पालघर जिल्हयातील प्रत्येक गांव, पाडयांपर्यंत पक्के रस्ते बांधून ही गांवे मुख्य रस्त्याला जोडण्याचे काम सुरु केले असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्हयाचे पालक मंत्री विष्णू सवरा यांनी रविवारी(२६ जून) पीक येथे केले. वाडा तालुक्यातील पीक-डाहे या दीड कोटी रु पये खर्चाचे अंदाजपत्रक असलेल्या रस्त्याचे भूमीपूजन विष्णू सवरा यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते. आपण मंत्री पदाची सूत्रे हातात घेतल्यापासून या जिल्हयातील रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण या विषयांना अग्रक्रम दिला असून अवघ्या दीड वर्षातच पालघर जिल्ह्यात सातशे कोटीहून अधिक रुपये खेडोपाडयातील रस्त्यांसाठी मंजूर केले आहेत. या रस्त्यांची कामेही सुरु झाली आहेत. येत्या दोन वर्षात ग्रामीण भागातील प्रत्येक रस्ता मुख्य रस्त्याला जोडला गेलेला असेल असेही सांगितले. या कार्यक्रमासाठी भाजपाचे प्रदेश सदस्य बाबाजी काठोळे, तालुकाध्यक्ष संदिप पवार, जिल्हा सरचिटणीस विजय औसरकर, डॉ. हेमंत सवरा आदिवासी आघाडीचे रविंद्र जोगवला आदी मान्यवर उपस्थित होते.(वार्ताहर)>आदिवासी उपयोजनेत समावेश असलेल्या प्रत्येक गावातील नागरिकांनी आदिवासी विकास खात्यातील विविध योजनांचा लाभ घेवून आपला आर्थिक स्तर उंचवावा असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. बचत गटांना लहान उद्योग करण्यासाठी आर्थिक मदत अथवा प्रत्यक्ष साहित्य देण्याचे कामही सुरु केले आहे. बचत गटांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन सवरा यांनी केले. यावेळी सवरा यांच्या हस्ते पीक येथील महिला बचत गटांना कॅटरर्सचे साहित्य तर पुरुष बचत गटांना बॅन्जो (वाद्य) साहित्याचे वाटप करण्यात आले.