शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडकरांना हवे आहे नवीन बसस्थानक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 23:16 IST

प्रवाशांचे हाल : पिकअप शेडवर भागवले जाते काम

विक्रमगड : विक्रमगड तालुक्याच्या ठिकाणी अद्ययावत एस.टी. बसस्थानकच नसल्याने येथे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात उन्हांत, पावसाळ्यात पावसात तासन्तास ताटकळत येथील प्रवाशांना एस.टी.ची वाट पाहावी लागते. विक्रमगड हे तालुक्यातील शहराचे मुख्य ठिकाण असतानाही येथे तालुका निर्मितीपासून बसस्थानक नाही. त्यामुळे सद्यस्थितीत २० वर्षापासून उपलब्ध पिकअप शेडवर काम भागविले जात आहे. या ठिकाणी अद्ययावत बसस्थानक उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात असतानाही याकडे कुणीही गांभीर्याने पाहात नाही.

विक्रमगड तालुक्याची लोकसंख्या जवळपास दीड लाखांच्या घरात जाऊन पोहचली आहे. तर विक्रमगड शहराची लोकसंख्या २५ हजारावर गेली आहे. येथून दररोज विविध ठिकाणी ये-जा करणाºया अंदाजित ६० ते ७० एस.टी. बसेस सुटतात. विक्रमगड शहर हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने सर्व सरकारी, निमसरकारी, खाजगी कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालय, इंजिनीअरिंग कॉलेज, आय.टी.आय. व विविध आस्थापनांमध्ये काम करणारे असंख्य अधिकारी व कर्मचारी, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी व दररोजच्या कामासाठी प्रवास करणारे एस.टी.चे असंख्य प्रवासी प्रवास करीत असतात. मात्र आजही गेल्या तालुका निर्मितीच्या २० वर्षापासून सुविधांविना विक्रमगड मुख्यालयी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे साधे पिकअप शेड आहे, तेही प्रवाशांना असून नसल्यासारखेच आहे. कारण बस पिकअप शेडसमोर एसटी बस थांब्यांसाठी जागाच शिल्लक राहात नाही, तर प्रवाशांना उभे राहण्यासाठीही जागा नाही. विक्रमगडसाठी असलेली सद्यस्थितीतली पिकअप शेड २० वर्षापूर्वी खासदार निधीतून बांधलेली आहे. त्यामुळे एस.टी. महामंडळाने प्रवाशांसाठी केले तरी काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.प्रसाधनगृहाचीही सोय नाहीच्विक्रमगड शहर हे तालुक्यातील ९४ गावपाड्यांचे मुख्यालय असल्याने दररोज गाव-खेड्यापाड्यांतून तसेच शहरांतून विक्रमगडमध्ये अगर विक्रमगडहून एस.टी. बसने विविध भागात जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर, नाशिक, शिर्डी, वाडा, भिवंडी, ठाणे, डहाणू आदी ठिकाणी हजारो प्रवासी प्रवास करीत असतात. मात्र तालुक्याचे मुख्यालय असूनही विक्रमगड शहरात अद्यापही अद्ययावत असे एसटी बसस्थानक नाही.च्परिणामी प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वृद्ध, रुग्ण, महिला प्रवाशांसाठी प्रसाधनगृहांची, पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने अशा प्रवाशांचे तर हाल पाहावत नाहीत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार