शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगड जि.प. शाळांना शिक्षकांची वानवा

By admin | Updated: October 24, 2015 00:29 IST

तालुक्यात एकूण २३७ शाळांपैकी करसुड, चिंचघर, बोरांडा (पाटीलपाडा, म्हसरोळी येथे मुख्याध्यापकांची ४ पदे रिक्त असून पदवीधर शिक्षकांची ७७ पदे, विस्तार अधिकारी

विक्रमगड : तालुक्यात एकूण २३७ शाळांपैकी करसुड, चिंचघर, बोरांडा (पाटीलपाडा, म्हसरोळी येथे मुख्याध्यापकांची ४ पदे रिक्त असून पदवीधर शिक्षकांची ७७ पदे, विस्तार अधिकारी ३ पदे, शिवाय आॅनलाइन संचमान्यतेप्रमाणे सर्वच पदे रिक्त असून शालेय पोषण आहार तीन क्लार्कपदांसह आराखडा मंजूर नसल्याने विक्रमगड तालुक्यात जि.प. शाळांना पुरेसे शिक्षक नाहीत. त्यामुळे शिक्षणाचा तालुक्यात बोजवारा उडालेला आहे. गंभीर बाब म्हणजे कमी पटसंख्या शाळांमध्ये अधिक शिक्षक कार्यरत असून जास्त पटसंख्येला कमी शिक्षक आहेत. त्यामुळे एकाच शिक्षकावर भर पडतो आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता कमी होत आहे. चार शाळांना मुख्याध्यापक रिक्त पदे असल्याने शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. एकीकडे शासनाने प्राथमिक शिक्षण हक्काची सक्ती करणारी संविधानात तरतूद केली. मात्र, नव्या पालघर जिल्ह्यातील अनेक आदिवासी तालुक्यांत त्याची अंमलबजावणी होत नाही. खरे म्हणजे कमी पटसंख्या असल्यास त्याचे समायोजन करणे आवश्यक आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे. आदर्श शिक्षक पुरस्काराच्या वेळी पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या कानांवर ही बाब घातली गेली. मात्र, त्यांचेही आपल्या मतदारसंघाकडे लक्ष नसल्याने मतदार नाराज आहेत. (वार्ताहर)