शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादी पुन:परीक्षण कार्यक्रमाचा उडाला फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 05:35 IST

तक्रारींचा पाऊस : निमंत्रण पत्रिकाच पोहचल्या नाही, शासकीय यंत्रणा तोंडघशी

वसई : मतदार यादी पुन:निरीक्षण कामासाठी गृहनिर्माण संस्थांच्या अध्यक्ष व सचिवांनी बी.एल.ओ ची भूमिका योग्य प्रकारे पार पाडावी व हे राष्ट्रीय कार्य समजावे असे परखड मत उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी महाजन यांनी निवडणूक संबधी माहिती देताना व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी उपस्थितांची रोडावलेली संख्या व या मोहिमेचे व्यापक उद्दिष्ट पाहता या मोहिमेचा पुन्हा फज्जा उडणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र आणि मतदार याद्यांचा पुन:निरीक्षण कार्यक्रम राज्यात सर्वत्र राबविण्यात येत आहे. अडीच मतदारसंघ असलेल्या वसई तालुक्यात सुद्धा हा कार्यक्र म सहकार व महसूल यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी दुपारी वसईतील सोमवंशीय क्षत्रिय सभागृह येथे आयोजित केला होता. दरम्यान, पालघर जिल्हा निवडणूक अधिकारी महाजन यांच्या निर्देशाने अवघ्या दोन दिवसाच्या कालावधीत हा महत्वाचा कार्यक्र म गडबडीत आयोजित करून वसईतील गृहनिर्माण संस्थांच्या अध्यक्ष व सचिव यांच्यासोबतच्या बैठकीसाठी हा राबविण्यात आला होता. मात्र, जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना आम्ही हा कार्यक्र म यशस्वी करू असे ठोस आश्वासन देणारे सहकार खाते आणि त्यांचे उपनिबंधक सोबत पालघर जिल्हा फेडरेशन या कार्यक्र माला उपस्थित असणारी गृहनिर्माण संथाच्या पदाधिकाºयांची संख्या पाहून चांगलेच तोंडघाशी पडले. परिणामी तासाभराने सुरु झालेल्या या महत्वपूर्ण कार्यक्र माचे मुळातच योग्य नियोजन व बहुतांशी पदाधिकाºयांना योग्य निमंत्रण न दिल्याने वसई तालुक्यातील साडेसहा हजार गृहनिर्माण संस्थांपैकी केवळ ५७ गृहनिर्माण सस्थांचे अध्यक्ष व सचिव उपस्थित राहिले. तसेच वसई प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर यांनी या मतदार याद्या कार्यक्र माची विस्तृत माहिती देताना मतदार नोंदणीच्या विशेष कार्यक्र मात जिल्ह्यातील सर्व मतदार, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष यांनी सक्रि य भाग घेऊन निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे असे ही सांगितले. यावेळी मंचावर जिल्हा निवडणूक अधिकारी महाजन, प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर, सहकारी संस्था, वसई उपनिबंधक प्रियांका गाडीलकर, नायब तहसीलदार मनीषा पिंपळे, विसपुते, ए आर, नालासोपारा अर्चना कदम , आणि जिल्हा हौसिंग फेडरेशन अध्यक्ष हार्दिक राऊत उपस्थित होते.साड सहा हजारांपैकी ५७ संस्थांची हजेरीया कार्यक्रमाला साडे सहा हजारापैकी केवळ ५७ संस्थेने आपली उपस्थित लावली त्यामुळे अन्य संस्थांना त्याची माहितीच नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पुन्हा रविवारी हा कार्यक्र म लावावा अशी मागणी करण्यात आली. तसेच अडीच मतदारसंघ असलेल्या वसई ,नालासोपारा व विरार भागातील व नवीन मतदार पाहता असे नियोजन करून विभागवार कार्यक्र म पुढील दिवसात व सुटीच्या दिवशी घेण्यात यावा अशा सूचना उपस्थितांनी केल्या.अध्यक्ष, सचिवांना बीएलओ चे काम सक्तीचेकरून वर्ष २०१० आणि २०१२ साली मतदार यादी पुन:निरीक्षण कामासाठी गृहनिर्माण संस्थांनी सहकार्य करणे अनिवार्य असल्या बाबतचे शासन आदेशाचे परिपत्रक आहे. तसे ते या पूर्वी ही पाठवण्यात आले होते. मात्र, अनेक गृहनिर्माण संस्थांनी हे परिपत्रक वाचण्याची तसदी देखील घेतली नाही त्यामुळे सर्वत्र गोंधळ आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार