शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडीओकॉनचे कामगार रस्त्यावर, पी.एफ.देखील लटकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 00:28 IST

व्हिडीओकॉन तोट्यात गेल्यामुळे तिचे कामगार आता रस्त्यावर आले आहे.

नालासोपारा : व्हिडीओकॉन तोट्यात गेल्यामुळे तिचे कामगार आता रस्त्यावर आले आहे. व्हिडिओकॉनच्या टेककेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने टॅक्समो आणि इन्फिनिटी या दोन कॉन्ट्रॅक्ट कंपनी बनवल्या असून यात वसई तालुका, मीरा भार्इंदर, पालघर आणि मुंबई येथील १६० कामगारांच्या परिवारावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. पालघर जिल्ह्यातील तसेच वसई तालुक्यातील २५ कामगार भार्इंदर येथील सर्व्हिस सेंटरवर काम करीत आहे. पण अचानक तोट्यात गेल्यामुळे कंपनीत कामावर असणाऱ्यांना ७ महिन्यापासून पगार दिलाच नाही. ३० वर्षापेक्षा जास्त काळ या कंपनीमध्ये काम करणाºया कामगारांना आत दुसरीकडे काम मिळू शकत नसल्याने व वयोमर्यादा वाढल्यामूळे मजबुरीने कामावर जावे लागत आहे पण पगार होत नाही.व्हिडिओकॉन च्या टेककेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने टॅक्समो आणि इन्फिनिटी कंपनी मध्ये विविध ठिकाणी असलेल्या ब्रँंचमधील १०६ कामगारांच्या देशातील दिल्ली, आगरा अशा अनेक राज्यात एप्रिल २०१८ मध्ये बदल्या करण्यात आल्या आहेत. पण त्या कामगारांनी या निर्णयाविरोधात कोर्टात धाव घेतल्याचे सूत्रांकडून कळते आहे तर काही जण अन्यत्र कामाला लागले आहे. तर काही जण घरी असल्याचेही कळते. व्हिडिओकॉन आणि टेककेअर कंपनीतील ४५ कामगार भार्इंदर, मरोळ, मुलुंड आणि वाशीमधील कंपनीच्या कार्यालयात दररोज कामावर जात आहे. पण कंपनी बंद झाली आहे की सुरू आहे हे कोणी सांगत नाही व कामही देत नाही. डिसेंबर २०१८ चा पगार १९ मार्चला २०१९ रोजी या कामगारांना देण्यात आला.कंपनी कामगारांची जबदरस्तीने बदली करेल असे कळल्यावर या कामगारांनी मे २०१८ मध्ये कामगार न्यायालयाचा दरवाजा ठोठावत या बदल्यांना स्थगिती मिळवली. टॅक्समो आणि इन्फिनिटी या कंपनीमधील बदली केलेल्या १०६ कामगारांचा ३ महिन्याचा पगार कोर्टाने आदेश दिलेला असूनही अद्याप दिला नसल्याचे कळते. ९ कामगारांनी सेवानिवृत्ती आणि स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. या कामगारांना अद्याप ग्रॅच्युईटी, बोनस, रजांचा पगार दिलेला नाही. भविष्य निर्वाह निधी देखील अडकून पडला आहे.काही कामगारांच्या नावात गडबड किंवा त्रुटी केल्यामुळे कामगारांना भविष्य निर्वाह निधी मिळत नसल्यामुळे ते हतबल झाले आहेत. कामगारांचा हिशोब मिळावा यासाठी बांद्रा येथील लेबल न्यायालयात केस सुरू असून तारीख वर तारीख सुरू असल्याने कामगारांना न्याय कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.एप्रिल २०१८ ते सप्टेंबर २०१८ या दरम्यान ४५ कामगारांचे पगार झाले पण त्यांच्या पगारातील ३० टक्के कंपनीची परिस्थिती खराब असल्यामुळे कापण्यात आल्याचे वरिष्ठांनी कामगारांना सांगितले व परिस्थिती सुधारल्यावर कापण्यात आलेले पगार परत देण्यात येईल पण तेही अद्याप दिलेले नाही.>व्हिडीओकॉन कंपनीने घेतले अनेक बँकांचे कर्जव्हिडिओकॉन कंपनीने मोठ्या प्रमाणात बँकांचे कर्ज घेतले होते. स्टेट बँक आॅफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, आयसीआयसीआय अशा अनेक बँकेचे कर्ज घेतल्याचेही कळते. युपीएच्या काळात बँकांचे कर्ज मिळत गेले पण एनडीएची सत्ता आल्यानंतर हे सर्व कर्जाचे प्रकरण उघड झाल्यावर यावर चाप लावण्यासाठी व बँकांचे कर्ज परतफेड करण्यासाठी एनसीएलटी मध्ये धाव घेण्यात आली आहे. या तपासानंतर व्हिडिओकॉन कंपनीने विविध बँकांचे नेमके कितीचे कर्ज घेतले आहे हा आकडा निश्चित होईल.>गेल्या अनेक वर्षांपासून कंपनीसाठी कामगार इमाने इतबारे काम करत आहे पण या कामगारांना आता या कंपनीने वाºयावर सोडून दिले आहे. सात महिन्यापासून पगार दिला नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.- शैलेश प्रधान, कामगार, नालासोपारा>व्हिडिओकॉन बंद झाली असून ती आता बँक चालवत आहे. व्हिडिओकॉनने आता स्वाबलंबन नावाची नवीन कंपनी उघडली असून बाकीच्या जुन्या कंपनीला बाजूला केले असून कामे नवीन कंपन्यांना देत आहे.- मुरारी सिंग राणा, कामगार, मिरा रोड