शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कबड्डी लीगच्या महासंग्रामात शिवशक्तीचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:31 IST

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने पालघर आर्यन मैदानात स्व. विद्या विनोद अधिकारी क्रीडानगरीत आयोजित जिल्हा कबड्डी लीग २०१८ च्या महासंग्रामातील अंतिम

पालघर : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने पालघर आर्यन मैदानात स्व. विद्या विनोद अधिकारी क्रीडानगरीत आयोजित जिल्हा कबड्डी लीग २०१८ च्या महासंग्रामातील अंतिम सामन्यातील चुरशीच्या लढतीत शिवशक्ती वॉरियर्सने कबड्डी किंग्सचा पराभव करत अंतिम विजेतेपद पटकावले.जिल्ह्यात प्रथमच हे कबड्डीचे सामने मॅटवर खेळण्याचा अनुभव येथील खेळाडूंना मिळाला. तसेच राज्यस्तरावर भरविल्या जाणाºया अशा भव्यदिव्य रोषणाईच्या प्रकाशझोतातील स्टेडियमचा अनुभवही येथील क्रीडा रिसकांना या निमित्ताने पाहावयास मिळाला. कबड्डीच्या या महासंग्रामात आठ संघानी आपला सहभाग नोंदवला. उपांत्य फेरीत गवळी रायडर्सचा कबड्डी किंगने ४ गुणांनी पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली तर दुसºया उपांत्य सामन्यात शिवशक्ती वारियर्सने गवळी रायडर्सचा ७ गुणांनी पराभव करत तिसºया स्थानावर समाधान मानावे लागले. तर सह्याद्री शिलेदार हा संघ चौथ्या क्र मांकावर राहिला. या लीगच्या अंतिम लढतीत शिवशक्ती वॉरियर्स विरुद्ध कबड्डी किंग्सच्या सामन्याच्या पहिल्या सत्रात कबड्डी किंग्ज संघ ९-२३ असा पिछाडीवर असताना दुसºया सत्रात जोरदार कमबॅक करीत कबड्डी किंगने शिवशक्ती संघावर दमदार खेळी करत आपली आघाडी राखण्यात यश मिळविले. मात्र, शेवटच्या काही क्षणात शिवशक्तीच्या खेळाडूंनी कबड्डी किंग्जवर पुन्हा मात करण्याच्या इर्षेने जोरदार खेळ करीत चार गुणांच्या फरकाने आपल्या प्रतिस्पर्धी टीम वर मात केली. विजेत्या संघाला ३ लाख व चषक तर उपविजेत्या संघाला २ लाख व चषक पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले. जिल्हा कबड्डी असो.चे प्रवीण राऊत, नितीन अग्रवाल, पालघर कला-क्रीडा प्रतिष्ठानचे विनोद अधिकारी, अध्यक्ष समीर पाटील, डॉ. हेमंत सवरा, विलास पाटील, निलेश सातवी प्रमोद पाटील आदी यावेळी उपस्थित होते. सूर्यतेज फायटर्स, गवळी रायडर्स, सह्याद्री शिलेदार, डायनामाइट, वाडा फायटर्स, शिवशक्ती वारीयर्स, कबड्डी किंग्ज यांनी सहभाग नोंदविला.