शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

तारापूर किल्ल्याचा विजय दिन जल्लोषात साजरा

By admin | Updated: February 2, 2017 02:41 IST

किल्ले वसई मोहीम परिवार व तारापूरचे ग्रामस्थ यांच्या सहभागाने जंजिरे तारापूर किल्याचा २७९ वा विजय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

बोईसर : किल्ले वसई मोहीम परिवार व तारापूरचे ग्रामस्थ यांच्या सहभागाने जंजिरे तारापूर किल्याचा २७९ वा विजय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी काढून भगवे झेंडे व पेटत्या मशालीनी सुशोभित केला होता. ग्रामस्थ व दुर्गमित्रांच्या साक्षीने किल्ल्याच्या वास्तुदेवतेचे प्रथम पूजन अ‍ॅड. गोपाळ बर्वे, दत्तात्रय चोरघे व अभिजित चोरघे यांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर वसई, तारापूर पालघर, डहाणू, मालाड, मुंबई या विभागातून आलेल्या १०० दुर्गमित्रांच्या साक्षीने जंजिरे तारापूरच्या किल्याच्या गौरवशाली इतिहासाला मानवंदना देण्यात आली. इतिहास अभ्यासक डॉ. श्रीदत्त राऊत यांनी तारापूरचा प्राचीन इतिहास व बाजी भीवराव रेठरेकर यांच्या पराक्रमाची ओळख दुर्गमित्रांना करून देवून मराठ्यांच्या आरमारी मोहिमा व शिवकालीन युद्धतंत्र यावर मार्गदर्शन केले. तारापूर रणसंग्रामाचे औचित्य साधून समस्त दुर्गमित्र तारापूर मोहिमेच्या युद्धस्थळी एकत्र जमले होते. यावेळी तारापूर किल्ल्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गास ‘नरवीर’ बाजी भीवराव रेठरेकर समाधी मार्ग असे नामांतरण करण्यात येवून राऊत यांच्या हस्ते या फलकाचे उद्घाटन करण्यात आले बाजी भीवराव रेठरेकर या नरवीराच्या पराक्र माचा व नरवीर चिमाजी आप्पांच्या युद्धनेतृत्वाचा साक्षीदार असणारा तारापूर किल्ला संवर्धन करण्यास येत्या मार्च व एप्रिल महिन्यात महाश्रमदान मोहीम आयोजित करण्यात येणार असल्याचे दुर्गमित्रांनी जाहीर केले. जंजिरे तारापूरच्या छोटेखानी इतिहास मार्गदर्शन पुस्तिकेच्या प्रकाशनासाठी अभ्यासक व स्थानिकांनी सहकार्य करावे असे आवाहन विवेक भिंगे यांनी केले. तर सिध्देश नानरकर व दीपाली पावसकर आगामी काळात दुर्गसंवर्धन मोहिमांचे नियोजने सादर करून त्या मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले . (वार्ताहार)